Who Is Madhuri Misal 
Maharashtra Assembly Elections

Pune Assembly Election: पर्वतीतून मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी; कोण आहेत माधुरी मिसाळ, जाणून घ्या

Who Is Madhuri Misal: माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा आमदारकीसा्ठी उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी तीनवेळेस आमदारकी भुषवलीय.

Bharat Jadhav

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघ आणि पर्वती विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून वाद निर्माण झाल्याने भाजपचं टेन्शन वाढलं होतं. या वादादरम्यान भाजपने अगोदरच्याच आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. आज भाजपने पहिली यादी जाहीर केली. यात पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभेतून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभेतून सिद्धार्थ शिरोळे यांना लढण्याची संधी दिलीय.

पर्वती मतदार संघात पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसून आले होते. या वादात नव्या उतरलेल्या नव्या माणसाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर भाजपने जुन्याच उमेदवारांना संधी दिलीय. पर्वती मतदार संघातून माधुरी मिसाळ यांना श्रीनाथ भीमाले यांनी आव्हान दिलं होतं. आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी मग मी कुठून लढू? असा प्रश्न पक्षालाच विचारला होता. मात्र यंदा मला वरिष्ठ निवडणूक लढविण्याची संधी देतील. म्हणूनच मी लढणार आणि जिंकणार असा निर्धार त्यांनी केला होता.

आज भाजपने यादी जाहीर करत त्यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर साम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिलीय. पुन्हा एकदा संधी मिळेल असं वाटलं नव्हतं पण पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. पर्वतीमध्ये पुन्हा एकदा विजयाचा विश्वास आहे. यंदा युतीची मोठी साथ आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चांगला समन्वय आहे. पुन्हा एकदा विजय या मतदारसंघातून मिळेल असा विश्वास मिसाळ यांनी व्यक्त केलाय.

शिवाजीनगर मध्ये विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुक असणारे अँड. मधुकर मुसळे काय करणार याकडे लक्ष लागले आहे. आता मात्र दंड थोपटलेल्या नेत्यांना भाजपने डावललं असून माधुरी मिसाळ आणि चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.

कोण आहेत माधुरी मिसाळ

स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या केशवराव देशपांडे यांच्या नात. माधुरी मिसाळ यांनी कॉमर्समधून पदवी मिळवली आहे. २००७ पासून पुण्यातील पर्वती या भागातून १० वर्षे नगरसेविका त्या राहिल्या आहेत. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून त्या तीनवेळा आमदार राहिल्या आहेत. माधुरी मिसाळ यांच्यावर भाजपच्या विधानसभा प्रतोदपदाची जबाबदारी होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अतिशय चांगले संबंध आहेत.

२००९ मध्ये त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्या. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माधुरी मिसाळ यांनी राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळवलं होतं. त्या ७० हजारापेक्षा अधिक विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या. २०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी पवर्ती मतदारसंघातून तब्बल २२ नगरसेवक निवडून आणलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT