PM Modi In Mumbai  
Maharashtra Assembly Elections

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

PM Modi In Mumbai: देशात स्वातंत्र्यानंतर अनेक दशके काँग्रेसचे सरकार होतं. या राज्यातही होतं. पण मुंबईसाठी कोणतीही योजना केली नाही. त्यामुळे मुंबई मागासली राहिली असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील सभेत केला.

Bharat Jadhav

महाविकास आघाडी देशापेक्षा आघाडी महत्त्वाची मानते, त्यामुळे ते देश प्रगती करत असतो तेव्हा आघाडीतील नेत्यांना त्रास होतो, अशी टीका पंतप्रधान मोदींनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झालेल्या सभेत केली. पंतप्रधान मोदींची आज महाराष्ट्रातील अखेरची सभा होती. या सभेत त्यांनी मविआला चांगलेच धारेवर धरलं.

आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्रात एकीकडे महायुतीची विचारधारा आहे. ज्यावर अभिमान बाळगते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे विचार आहेत. जे महाराष्ट्राचं अपमान करत आहेत. महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झालेत. ही आघाडी जी राममंदिराचा विरोध करते. जे मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्द आणते. ही जी आघाडी आहे, ते नेहमी वीर सावरकरांचा अवमान करते. काश्मीरमध्ये कलम ३७० च्या वापसीसाठी प्रस्ताव मंजूर करते, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी विरोधकावर धावा बोलला.

आघाडीसाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष मोठा आहे. भारत जेव्हा पुढे जातो, तेव्हा आघाडीवाल्यांना त्रास होतो. भारताच्या प्रत्येक य़शावर आघाडीवाले प्रश्न उपस्थित करते . महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठी भाषेला अनेक दशकांपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. मात्र महायुतीने सरकारने सत्तेत येताच तो दर्जास दिला.

आम्ही अभिजात दर्जा दिला, तेव्हा या आघाडीच्या लोकांना साप दंश करतोय की काय असे शांत बसतात,ते त्यांचे कौतुक करत नाहीत असं पंतप्रधान मोदी म्हणाले. याच कारणामुळे तुम्ही जनतेने महाविकास आघाडीच्या राजकारणापासून आणित हेतूपासून सावधान राहण्याची गरज आहे.

मुंबई स्वप्नांची नगरी आहे, आणि महायुती स्वप्न पूर्ण करणारी युती आहे. देशातील गरिब आणि मध्यमवर्गीय लोकांना अनेक वर्षांपर्यंत मोकळेपणे स्वप्न पाहता येत नव्हतं. आज त्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत. स्टार्ट अप मोहीम सुरू केली. मुंबईत अनेक स्टार्टअप कंपन्या येत आहेत. अनेक गरीब आणि मध्यवर्गीय लोकांना पक्कं घरं, कमी व्याजदरात गृहकर्ज मिळत आहे. रेरा कायद्यामुळे आर्थिक नुकसान होत नाही. ७० लाख रेडी पटरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजनेच्या मदतीने आपला व्यापार वाढवण्यास मदत मिळाली.

त्याचा फायदा मुंबईचे १ लाखांहून अधिक जणांना याचा लाभ मिळाला आहे. मुंबईच्या सहकाऱ्याचे आभार मानतो. एक वर्षापूर्वी त्यांच्या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली होती. तुमचे स्वप्नच आमचा संकल्प आहे,.मोदी तुमच्या स्वप्न जगतात. तुमच्या स्वप्नांसाठी जागं राहतो. ते पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करण्याची गॅरंटी देतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT