विधानसभा निवडणुका तोंडावर आले असतानाच महायुतीमधील वाद चव्हाट्यावर येत आहे. विधानसभेच्या नांदगाव मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. येथेील आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैरामुळे महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आहे त्यामुळे शुभेच्छांचे नवीन नवीन फलक दिसत आहेत . पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्धांच्या कृपेने छगन भुजबळने येथे जे काम केलं त्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आमचं काम रोजचं त्यांचं काम निवडणुकांपुरत,असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी आमदार कांदे याच्यावर टीका केलीय. ते येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेला ८९ वर्षे पूर्ण झाली आहेत. येवल्यातील मुक्ती भूमीवर जाऊन छगन भुजबळ यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी नांदगाव मतदरासंघातील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका केलीय. मुक्ती भूमीचे महत्व वाढवण्यासाठी आपण येथे विकासकामे केली. आम्ही रोजच कामे करतो, तर कांदे यांचे काम फक्त निवडणुकांपूरते असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
येवल्याच्या भूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर नागपूरला दीक्षाभूमीवर कोट्यावधी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. मुक्ती भूमीचे महत्व वाढवण्यासाठी येथे आरण वेगवेगळी विकास काम केली. निवडणूक आहे त्यामुळे शुभेच्छांचे नवीन नवीन फलक दिसत आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्धांच्या कृपेने छगन भुजबळांनीन येते जे काम केले त्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही.
आमचं काम रोजचं त्यांचं काम निवडणुकांपुरत आहे असं छगन भुजबळ म्हणालेत. पुढे बोलतांना त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. आमचे गोरगरीब लोक निवडणूक असो किंवा नसो ते दरवर्षी इथे येतात. आता काही राजकीय नेते आपलं बेगडी प्रेम दाखवण्यासाठी इकडे येणार आहेत, जे कधीच येथे आले नाहीत. त्यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर डोकं ठेवलं नाही, असे देखील लोक येतायत, पण त्यांचे स्वागत आहे असा टोला त्यांनी जरांगे यांना लगावला.
काही दिवसापूर्वी सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यावर समीर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. ज्यांच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेले असतील तर ते असाच विचार करणार. सूर्य कुठे, तुम्ही सूर्याची तुलना करू शकता का? असा टोला समीर भुजबळ यांनी छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवू आणि जिंकू, असा दावा करणाऱ्या सुहास कांदेंना लगावला होता.
निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की बाबासाहेबांच्या अनुयायांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी बॅनर्स लावले असतील. उमेदवारीवरून बोलताना समीर भुजबळ म्हणाले, त्यांना येवल्यातून तिकीट मिळालं तर ते उमेदवारी करतील ना. जर मला नांदगावमधून तिकीट मिळालं तर मी उमेदवारी करेल, आम्ही युतीमध्ये आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.