Rahul Gandhi 
Maharashtra Assembly Elections

Rahul Gandhi: राहुल गांधी खोटं बोलतात, त्यांना रोखा; भाजपला नेमकी कोणती गोष्ट खटकली, थेट EC कडे धाव

BJP Complaint To EC: गेल्या आठवड्यात मुंबईत दिलेल्या राहुल गांधींच्या भाषणाचा काही भाग दाखवत भाजपने त्यांची तक्रार केलीय. राहुल गांधी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केलाय.

Bharat Jadhav

विधानसभा निडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाआधी भाजप निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीय. आचार संहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांनी आयोगाकडे केलीय. राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारात खोटं बोलत आहेत, त्यांना थांबवा त्यांना राग द्या असं भाजपने आपल्या तक्रारीत म्हटलंय.

मागील आठवड्यात राहुल गांधी यांनी मुंबईतील एका प्रचार सभा घेतली होती. त्या सभेचा एक भाग काढत भाजपने निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केलीय. राहुल गांधींनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपने केलीय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केलीय. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केलीय.

भाजपने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, राहुल गांधी यांनी प्रचारसभेत खोटं बोललं. महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात नेण्यात आले असा आरोप केला. त्यांनी केलेला हा आरोप खोटा असल्याचं भाजपने म्हटलंय. ॲपलचे आयफोन आणि बोईंग विमाने महाराष्ट्राऐवजी अन्य राज्यात तयार होत असल्याचा राहुल गांधींचा दावा चुकीचा आणि निराधार असल्याचे भाजपने आयोगाला दिलेल्या तक्रार पत्रात म्हटलंय.

भाजपने निवडणूक आयोगाकडे राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात यावी अशी मागणी केलीय. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. राहुल गांधी महाराष्ट्राविषयी खोटं बोलत आहेत.

भाजप संविधानाशी छेडछाड करत आहे असा राहुल गांधीकडून करण्यात आलेले आरोपही खोटे असल्याचं भाजपच्या शिष्टमंडळाने आयोग अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सांगितलं.

भाजपने आपल्या तक्रार पत्रात लिहिले की, " जसं अपेक्षित होतं आणि त्यांच्या प्रचाराच्या आणि सामान्य वर्तनाच्या विशिष्ट पद्धतीनुसार राहुल गांधींचे भाषण खोटे आणि खोटेपणाने भरलेले आहे. राहुल गांधींच्या आरोपांचा उद्देश हा देशातील राज्यात भांडणं लावण्याचा त्यातील असंतोष वाढवण्याचा, दोन राज्यातील शत्रुता निर्माण करणारा आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळावे यासाठी राहुल गांधी वारंवार खोटं बोलत आहेत, त्याचे आरोप तथ्यहीन असल्याचंही भाजपनं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT