Maharashtra Assembly Elections

Assembly Election:निकालानंतर सत्ता समीकरण बदलणार? नवाब मलिकांपाठोपाठ वळसे पाटलांचे संकेत

Assembly Election: विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असतानाच निकालानंतर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागलीय. मात्र सत्तेचं नवं समीकरण नेमकं काय असणार आहे? याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक रंगात आलीय. त्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झालीय. तर दुसरीकडे निकालानंतर मुख्यमंत्रिपद कुणाकडे? यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच निकालानंतर सत्तेचं नवं समीकरणाचे संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देण्यास सुरुवात केलीय.

आधी नवाब मलिकांनी निकालानंतर दादाच किंगमेकर ठरण्याचा दावा केला होता. तर आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनीही राज्यात सहा पक्ष असून निकालानंतर नवं समीकरण तयार होण्याचे संकेत दिलेत.

2014 मध्ये राज्यातील सर्वच पक्ष वेगवेगळे लढले आणि निकालानंतर आधी राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठींबा दिला होता. तर त्यानंतर पुन्हा भाजप आणि शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र 2019 नंतर राज्यात सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोतच बदलला. मात्र 2019 नंतर राज्यात घडलेल्या घडामोडी कोणत्या आहेत पाहूयात.

2019 नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी

2019 मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये फूट

2019 मध्ये शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसची मविआची स्थापना

2019 मध्ये अजित पवार आणि भाजपचं 80 तासांचं सरकार

2022 शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट आणि भाजपची सत्ता

2023 मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांचा महायुतीत सहभाग

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यात 6 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याबरोबरच मनसे, वंचितसह तिसरी आघाडी आणि अनेक अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निकालानंतर कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास पुन्हा 1995 प्रमाणे अपक्ष आणि छोटे घटकपक्ष महत्वाची भूमिका बजावू शकतात.

त्यातच दादांच्या पक्षाच्या नेत्यांकडून नव्या समीकरणाचे संकेत दिल्याने दादा निकालानंतर मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीला डच्चू देणार की आणखी नवी समीकरणं राज्याला पाहायला मिळणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT