Devendra Fadnavis on Maharashtra Cabinet Expansion saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार? 105 पैकी तब्बल 'इतक्या' जागा धोक्यात, आमदार धास्तावले

Maharashtran Vidhan Sabha BJP Winning Plan : नुकतीच भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांचा आढावा घेण्यात आला. यापैकी ८५ जागा या निवडणुकीतही आपण जिंकू असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते सतर्क झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या रणनित्या आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी बैठकांचा धडाका देखील सुरु आहे. नुकतीच भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांचा आढावा घेण्यात आला. यापैकी ८५ जागा या निवडणुकीतही आपण जिंकू असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मात्र, २५ जागा धोक्यात असून त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, असा सूर पक्षाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत देखील या जागांवर विजय मिळवण्यासाठी चर्चा होत आहे. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल १२२ जागा जिंकल्या होत्या.

मात्र, २०१९ मध्ये यापैकी १७ जागा कमी झाल्या. शिवसेनेसोबत युती असूनही भाजपला केवळ १०५ जागांवरच विजय मिळवता आला. आता आगामी निवडणुकीत १०५ पैकी तब्बल २५ जागा धोक्यात असल्याचा अहवाल भाजपला प्राप्त झाला आहे. कुठल्याही परिस्थिती या जागा जिंकता याव्यात यासाठी वेगवेगळ्या रणनित्या आखल्या जात आहेत.

सध्या भाजपकडून ८५ जागांवर विशेष लक्ष केंद्रीय केले जात आहे. या जागा निवडून येण्याच्या शक्यतेच्या आधारे ए, बी आणि सी कॅटेगिरी करण्यात आल्या आहेत. यामध्ये २०१४, २०१९ आणि २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांत भाजपला बुथनिहाय झालेले मतदान आणि यावेळी किती मतदान मिळून शकते, याचा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, ज्या ८५ जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास आहे. त्या सर्वच जागा गेल्यावेळी जिंकलेल्या आहे असं नाही. त्यापैकी ५ ते ७ जागा धोक्यात आहेत. गेल्यावेळी ७ जागा भाजपने अत्यंत कमी मताधिक्यांनी जिंकल्या होत्या. यावेळी या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असं पक्षश्रेष्ठीचे मत आहे.

पण हरलेल्या ५ ते ७ जागा पुन्हा जिंकता येऊ शकतात. असा फील्डबॅक पक्षश्रेष्ठीत महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्याने दिला आहे. दुसरीकडे भाजप महायुतीमध्ये १५५ ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. यातील १२५ जागा जिंकण्याचे ध्येय पक्षाने ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT