Maharashtra Political News Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : विधानसभेची मस्ती, बाप-लेकात कुस्ती? कोण जिंकणार राजकीय सामना, पाहा VIDEO

Maharashtra Political News : पिता-पुत्रांमध्ये राजकीय सामना झाल्यास कुस्ती कोण जिंकणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

तन्मय टिल्लू, साम टीव्ही मुंबई

लोकसभेचा गुलाल खाली पडताच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. अशातच येत्या निवडणुकीत पिता-पुत्रांमध्ये राजकीय लढाईचा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने काही मतदारसंघात बाप आणि लेक एकमेकांसमोर निवडणुकीला उभे राहणार आहेत. त्यामुळे पिता-पुत्रांमध्ये राजकीय सामना झाल्यास कुस्ती कोण जिंकणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

राज्यातील राजकारण गेल्या 5 वर्षात कमालीचं बदललं आहे. यात घरातच दोन गट किंवा दोन पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता ऐन विधानसभेच्या तोंडावर राज्यातील तीन पिता पुत्र एकमेकांविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे घरातच लढत रंगणार आहे. कोण आहेत तीन पितापुत्र ज्यांच्यात लढत रंगणार आहे पाहूयात.

शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यात विधानसभेची लढत होऊ शकते. ठाकरेंचे निष्ठावान सुभाष देसाईं यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचा मुलगा भूषण देसाई यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे. तर राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गटासोबत गेलेले नरहरी झिरवळ यांच्याविरोधात त्यांच्याच मुलला उमेदवारी देण्याचा शरद पवारांनी प्लान आखला आहे.

2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा मुंबईचे उत्तर-पश्चिम खासदार गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे गटात आले. तर त्यांचे पूत्र अमोल कीर्तिकर यांनी वडीलांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. आता विधानसभा निवडणूकीत अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदे गट त्यांचे वडील माजी खासदार गजानन कीर्तिकर यांना उभे करतात का याची उत्सुकता कायम आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे जुने जाणते निष्ठावंत सुभाष देसाई यांच्या विरोधात त्यांचा मुलगा भूषण देसाई यांनी लढण्याचा निर्णय घेतलाय. जरी दोघे एकमेकांविरोधात उभे राहीले नसले तरी प्रचार मात्र एकमेकांविरोधात करण्याची शक्यता आहे. तिसरीकडे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतीचे नरहरी झिरवळ दींडोरीचे आमदार आहेत.

त्यांचे पूत्र मात्र गोकुळ झिरवळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत घरातच दोन गटात चुरशीची लढत रंगणार एवढं निश्चित आहे. तर दुसरीकडे घरातच सत्ता टिकवण्यासाठी केलेली राजकारण्यांची ही खेळी तर नाही ना असाही सवाल उपस्थित होतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT