Maharashtra Assembly Elections

Assembly Election: महाराष्ट्र में फिर एक बार, महायुती सरकार!; पुण्यात पंतप्रधान मोदींचा नारा

PM Modi In Pune: पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीची सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Bharat Jadhav

पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. ⁠मी तुम्हाला विश्वास देतो, महायुतीचं नवीन सरकार आणखी वेगानं पुण्याच्या विकासासाठी काम करेल, अशी ग्वाही देताना पंतप्रधान मोदींनी पुण्यात 'महाराष्ट्र में फीर एक बार, महायुती सरकार'चा नारा दिला.

पुण्यात मला येण्यास उशीर झाला. परंतु रस्त्यावर माझ्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोकं उपस्थिती होती, त्यांना मी नमस्कार करत करत आलोय. आता येथेही मोठ्या संख्येने नागरिक आलेत. यावरून लक्षात येतं की, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बनणार आहे, असा विश्वास करत त्यांनी महाराष्ट्र में फिर एक बार महायुती सरकार अशी घोषणा दिली.

पुणे शहराने भाजपच्या विचाराचा समर्थन केलंय. त्यामुळे मी पुण्यातील नागरिकांचा आभाक करतो. येणारं महायुतीचं सरकार मोठ्या तेजीने काम करेल आणि पुण्याच्या विकासाला नवीन पंख लावेल असाही विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. पुण्याला अजून सशक्त करण्यासाठी गुंतवणूक, इंडस्ट्री,आणि इन्फ्रास्ट्रक्चर या तीन गोष्टींची गरज आहे. याच्या पैलूवर काम आम्ही चालू केलं असून त्यातून परकीय गुंतवणुकीत वाढ झालीय.

यात ज्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या आवडत्या ठिकाणात आपलं महाराष्ट्र असल्याचं मोदी म्हणाले. ⁠इन्ट्रासिटी आणि इंटरसिटी कनेक्टिविटीसाठी महायुती सरकार प्रयत्न करत आहे. लोकांच्या आकांक्षा माझ्यासाठी तुमचा आदेश आहे. तुमचे स्वप्न माझ्यासाठी दिवसरात्र काम करण्याची ऊर्जा देतात. तुमची आवश्यकता ह्या माझ्या सरकारच्या योजनांचे आकार देतात. तुमचं जीवन सुखकर व्हावे ,हे महायुती सरकारची प्राथमिकता आहे. यामुळे पुण्यात मेट्रोचा विस्तार होत आहे. ⁠स्वारगेट- कात्रज सेक्शन मध्ये मेट्रोचं काम वेगाने पुढं जात आहे.

आधीच्या आघाडी सरकारकडे तुम्हाला सांगण्यासारखे काही नाही. ⁠त्यांचे अडीच वर्ष आमच्यावर आरोप करण्यातच गेले. ⁠महायुती आहे तर महाराष्ट्रात विकासाला गती आहे. कर्नाटकात काँग्रेसने खूप वचनं दिली. पण सरकार आल्यावर हात वर केले. उलट जनतेकडून वसुली सुरू केली, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

Diwali 2025: दिवाळीत मातीचेच दिवे का लावतात? त्याचे फायदे काय?

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

Prem Birhade : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT