Maharashtra Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान; EVM मध्ये कैद होणार ४,१३६ उमेदवारांचं भवितव्य

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे.

Bharat Jadhav

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नोव्हेंबर २० रोजी म्हणजेच आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होईल. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडले. नागरिकांना सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल.

त्या मतदान केंद्रावर मतदान घेतल्या जाईल. या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी राज्यभरात तब्बल 5 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी अव्यहतपणे कार्यरत असणार आहेत. मतदानासाठी राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र सज्ज करण्यात आली आहेत.

मतदार नोंदणीत वाढ

राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण 4 हजार 136 उमेदवार आहेत. ज्यामध्ये 3771 पुरूष, 363 महिला आणि तर अन्य 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर राज्यातील एकूण ९.७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये पुरुष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतके आहेत. आणि ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात एकूण महिला मतदार 4,69,96,279 आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. तर 6,101 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील मतदारांची संख्या 1,16,170 आहे.

मतदानासाठी 2,21,600 बॅलेट युनिट

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने EVM उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांसाठी साधारणपणे 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 VVPAT (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएमपैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट व 5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आलाय.

यासर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण 185 विधानसभा मतदाररसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर १०० मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.

१ लाखांहून अधिक मतदान केंद्र सज्ज

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र असणार आहेत. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे - 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.

महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या 241 इतकी आहेत. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar Politics : पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; बविआ आमदार क्षितिज ठाकूरांविरोधात गुन्हा

Maharashtra Politics : विरारमध्ये राडा, डहाणूत पक्षप्रवेश; मतदानापूर्वी बविआ उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

Maharashtra News Live Updates: बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांविरोधात गुन्हा दाखल

Vinod Tawde: भाजप नेत्यानं टीप दिल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा; विनोद तावडे म्हणाले, कारमध्ये काय चर्चा झाली मलाच माहिती

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटले नसून त्यांचावरच हल्ला झालाय; विरार प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT