Money Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : खळबळजनक! १० दिवसांत राज्यात १०० कोटींची मालमत्ता जप्त, आचारसंहितामध्ये मोठी कारवाई!

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या विधानसभा निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू आहे. या १५ ते २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या काळात निवडणूक आयोगाने कारवाई करत कोट्यवधी जप्त केलेत.

Namdeo Kumbhar

Election Code Of Conduct : राज्यात सध्या आदर्श आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैणात आहे, जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. आचारसंहिता लागल्यापासून दहा दिवसांत राज्यात तब्बल १०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुणे, हिंगोली, छत्रपती संभाजीनगरसह राज्यात पोलिसांनी विशेष कारवाई करत १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

१०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

१२५० तक्रारी निकाली काढल्या -

सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या १२५० तक्रारी निकाली लावण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १२५९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १२५० तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी दिली.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

हिंगोलीत एक कोटींची रोकड पकडली -

हिंगोलीमध्ये वाहनाची तपासणी करताना दोन कारमध्ये एक कोटी ४० लाख रुपायांची रोकड पोलिसांनी पकडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली. शिरुरमध्ये १८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सतरा कमान पुलाजवळ तपासणी करताना पोलिसांनी एका व्यक्तीकडून १८ लाख रुपयांची रोकड जप्त केली. पनवेलजवळ पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर सहा लाखांची रोकड जप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT