Maharashtra Politics: आधी राऊतांनी आरोप केला, आता रोहित पवारांनी व्हिडीओ टाकला; नोटांचा ढीग पाहून डोळे चक्रावतील!

Rohit Pawar Criticized Shahaji Bapu Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर सोशल मीडिया पोस्ट करत आणखी चार गाड्या कुठे गेल्या? असा सवाल उपस्थित केला आहे.
Maharashtra Politics: आधी राऊतांनी आरोप केला, आता रोहित पवारांनी व्हिडीओ टाकला; नोटांचा ढीग पाहून डोळे चक्रावतील!
Rohit Pawar Saam Tv
Published On

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता राज्यात लागू झाली असतानाच पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाका येथील निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका कारमधून ५ कोटी रुपये मिळाल्याची घटना समोर आली. ही कार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर सोशल मीडिया पोस्ट करत आणखी चार गाड्या कुठे गेल्या? असा सवाल उपस्थित केला आहे. रोहित पवारांनी या पोस्टमध्ये पैशांच्या ढिगाचा फोटो देखील शेअर केला आहे.

खेड शिवापूर टोलनाका येथील चेक पोस्टमध्ये अशा प्रकारचे पैसे आढळून आल्यानंतर राज्य सरकारवर सडकून टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप केला जात आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवारांनी सोशल मीडिया ५ कोटी रुपये सापड्याचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे यामध्ये पैसाच पैसा दिसत आहे.

रोहित पवारांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५- २५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक कार खेड-शिवापूरच्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला.'

तसंच, 'विधानसभेलाही #दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!', अशा शब्दात रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Maharashtra Politics: आधी राऊतांनी आरोप केला, आता रोहित पवारांनी व्हिडीओ टाकला; नोटांचा ढीग पाहून डोळे चक्रावतील!
Maharashtra Politics: पुण्यात सांगोल्याच्या कारमधून ५ कोटी जप्त, राऊतांच्या आरोपावर शहाजी पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले 'माझ्याविरोधात....'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com