Maharashtra Assembly Elections

Uddhav Thackeray: देवा भाऊ! माझ्या सभेतील गर्दी नक्की पाहा; उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांना कोपरखळी

Uddhav Thackeray: कळमनुरी येथील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला.

Bharat Jadhav

देवा भाऊ आणि शिंदे दोघांनी माझ्या सभेतील गर्दी पाहावी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची कानपिचकी घेतली. कळमनुरी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. सभेत होणाऱ्या गर्दीवरून उद्धव ठाकरेंनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय.

भाषणातील पहिलाच बाण बांगर यांच्यावर

संतोष टापरे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलाताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या एक है तो सेफ, लाडकी बहीण, हिंदूत्व,आरक्षण, शेतकरी, या आदी मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आणि राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरलं. टापरे यांच्यासाठी मत मागताना उद्धव ठकारे म्हणाले, मी कळमनुरीमध्ये गुंडगिरी गाडण्यासाठी आलोय. असं म्हणत ठाकरेंनी पहिलाच बाण बांगर यांच्यावर सोडला.

संतोष बांगर यांना तिकीट दिले मी चूक केली मी हात जोडून माफी मागतो. गद्दार गेले पण निष्ठावंत सैनिक सोबत आहेत. या निवडणुकीत असे पाडा की पुन्हा शिवसेना फोडण्याचे स्वप्न पाहून नये. वर्षा बंगला सोडताना संतोष बांगर खिडकीमधून म्हणाला साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षां सोडू नका पण दुसऱ्या दिवशी तिकडे गेला. संतोष बांगर यांना मी नेहमी वाचवले पण तो गद्दार निघाला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.

अनेक प्रश्न सोडवले असते

मला समाधान आहे, कोरोना काळात आपण नंबर 1 काम केलं. आम्ही घरी बसून होतो पण विरोधकांनी घरे फोडली. मला मुख्यमंत्री असताना कालावधी कमी मिळाला अन्यथा अनेक प्रश्न सोडवले असते. हिंगोलीत हळद प्रकल्प दिला तसेच सोयाबीन प्रकल्प देखील देऊ. सोयाबीन,कापूस ,डाळ उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. आमच्या काळात सोयाबीनसाठी १० हजार रुपयांचा भाव होता तो ३ हजार झालाय.

भाजपचे हिंदुत्व घरे पेटवून देणारं

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरून भाजपवर टीका केली. आमच्यावर टीका केली जाते. बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत,आम्ही भाजप सोडली आहे. आम्ही विचार सोडले नाहीत, तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही सोबत आलो आहोत, भाजपने आम्हाला फसवलंय.आमचे हिंदुत्व घर चूल पेटवनारे आहेत, भाजपचे हिंदुत्व घरे पेटवून देणारी आहेत. मोदी आणि शहा म्हणतात एक है तो सेफ है.

आम्ही एकच आहोत आणि आम्ही एक होऊन भाजपला साफ करणार. त्यांचा मित्र आणि ते म्हणजे भाजपने जो काही नारा दिलेला एक आहे तो सेफ आहे ,फक्त एक सेफ आहे तो म्हणजे अडाणी सेफ आहे एकच आहे भ्रष्टाचारी सेफ आहे. मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांची सुरुवात केली म्हणून दाखवलं. पण ती टेंडर एवढी फुगवली एवढी फुगवली की अजून ते रस्त्याची कामं सुरू झाली नाहीत.

उद्योगांवरून टीका

निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील टाटा एअर बेस हा उद्योग गुजरात मध्ये गेला आहे. महिलांना १५०० रुपये द्यायचे त्यांना वाटतं १५०० रुपये दिले बस झालं. आता महिलांची मत मिळाली महिलांच्या मतांची तुम्ही किंमत करता. बहिणींची तुम्ही किंमत करता नुसती किंमत करत नाही त्याची जाहिरात करतात ,लाज वाटली पाहिजे. मी दिलेले वाचन पूर्ण करणार.

मी जबाबदारी घेतोय. महिला पोलीस आणि महिला पोलीस स्टेशन उभे करणार. तसेच आमचे सरकार आले तर Gst मध्ये बदल करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात केवळ ठाकरे गॅरंटी चालते मोदी नाही म्हणून तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावता. आम्ही घराण्याची परंपरा जपतो ,तुम्ही काय करत होते, ऐकदा सांगा, तुमचा घराणं सांगा. मोदी, शहा दिल्लीमधून राज्य चालवू शकत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT