Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: लोकसभेत तह विधानसभेत चेकमेट; पुरंदरमध्ये राष्ट्रवादीनेच वाढवलं महायुतीच्या विजय शिवतारेंचं टेन्शन

Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचं टेन्शन वाढवलं. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

राष्ट्रवादीसाठी लोकसभेत आपली तलावर म्यान करणाऱ्या विजय शिवतारे यांना राष्ट्रवादीने विधानसभेतही चेकमेट केलंय. लोकसभेत सुनेत्रा पवारांसाठी तह करणाऱ्या शिवतारेंचं राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेतही टेन्शन वाढवलंय. विजय शिवतारे यांना उमेदवारी मिळाल्यानंतरदेखील राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. त्याचप्रमाणे संभाजी झेंडे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. यामुळे पुरंदरमध्ये शिवतारे यांचे टेन्शन वाढलंय.

विजय शिवतारे यांनी अजित पवारांना लोकसभेवेळी अडचणीत आणला होतं. त्याच विजय शिवतारेंना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे दिगंबर दुर्गाडे मैदानात उतरलेत. दिगंबर दुर्गाडे यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय. त्यात भर म्हणजे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले विखे पाटील कुटुंबियांचे जावई संभाजी झेंडे यांनीही शिवतारे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने संभाजी झेंडे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय. यामुळे विजय शिवतारे व आमदार संजय जगताप यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संभाजी झेंडे हे माजी जिल्हाधिकारी आहेत. संभाजी झेंडे यांनी पुरंदर मतदार संघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदार संघात मोठं शक्ती प्रदर्शन केलं. संभाजी झेंडे यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीत मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक उपस्थित होते.

विशेष म्हणजे माजी मंत्री असलेल्या आणि मराठवाड्यातील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भगिनीचे पती असलेले माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जरी अर्ज दाखल केला असला तरी "माझ्या पाठीशी माझं गाव माझी जनता असल्याने मी मोठ्या मतांनी जिंकून येईल" असा विश्वास संभाजी झेंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान संभाजी झेंडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पुरंदरमध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याची चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे लोकसभेत विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार याचा प्रचार केला होता. सुरुवातीला शिवतारे यांनी आक्रमक पवित्रा घेत निवडणूक लढवण्याचा निश्चय केला होता. मात्र राष्ट्रवादीला जागा सोडल्यामुळे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. तरीही शिवतारे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. शेवटी त्यांचं समजूत काढत त्यांना निवडणूक न लढवण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार केला. मात्र आता ज्या राष्ट्रवादीसाठी आपली तलवार म्यान केली त्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवतारे यांच्या अडचणीत वाढ केलीय.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. अजित पवारांना लोकसभेवेळी विजय शिवतारे यांनी अडचणीत आणले होते. त्यामुळे शिवतारे यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे दिगंबर दुर्गाडे मैदानात उतरल्याची चर्चा आहे. पुरंदरमध्ये महाविकास आघाडीकडून आमदार संजय जगताप हे उमेदवार आहेत. तर महायुतीने शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर केली. आता झेंडे आणि दुर्गाडे यांनी अर्ज भरल्याने येथे चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे. आता उमेदवारी अर्ज मागे कोण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT