Raj Thackeray In Borivali 
Maharashtra Assembly Elections

Raj Thackeray Rally: बॉम्बे ? मुंबई बोलायला लाज वाटते का? राज ठाकरेंचा सणसणीत सवाल

Raj Thackeray Borivali : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बोरिवली विधानसभेचे उमेदवार कुणाल माईणकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मुंबईला बॉम्बे बोलणाऱ्याचा समाचार घेतला.

Bharat Jadhav

प्रत्येक भाषेचा अभिमान बाळगणं आवश्यक आहे आणि बाळगला पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यावर भाषेवर प्रांत रचना झाली. त्यानंतर त्या त्या भागात त्या प्रांताची भाषा बोलवणारे लोक राहतात. मग तरी या शहरात राहणारे लोक बॉम्बे, बॉम्बे का बोलतात, असा सणसणीत सवाल महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

बोरिवलीतील मनसेचे उमेदवार कुणाल माईणकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे बोलत होते. मुंबईला बॉम्बे संबोधणाऱ्या लोकांना राज ठाकरेंनी शाब्दिक चपराक मारली. यावेळी राज ठाकरेंनी मुंबई शहराला मुंबई असे नाव कसे पडले याचीही माहिती दिली.

तुम्हाला उत्तम शहरे मिळू शकतात फक्त तुम्हाला उत्तम आमदार निवडता आला पाहिजे. यावेळी त्यांनी नाशिकमधील रस्त्यांचं उदाहरण दिलं. तेथील महानगरपालिकेत मनसेची सत्ता आली होती. त्यावेळी शहरातील रस्ते चांगले बनवले होते. तेथे कोणत्याच प्रकारचे खड्डे पडले नाहीत. त्यामुळे सर्व चांगलं मिळत असते, फक्त नेत्यांची करण्याची इच्छा असली पाहिजे.तुम्हाला शहर मिळू शकतात, उत्तम रस्ते मिळू शकतात फक्त तुम्ही उत्तम आमदार निवडता आला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

परंतु नागरिक राजकीय नेत्यांना प्रश्न विचारत नाहीत. त्यामुळे राजकीय नेते काही करत नाहीत. निवडणूक प्रचाराला आला की त्याला प्रश्न विचारला पाहिजे. त्याने त्यांना भिती वाटली पाहिजे. जाती, ओळखीचा , नात्याचा उमेदवार असल्याने आपण त्यांना मत करतो. परंतु चांगला काम करतो की नाही याचा विचार करत नाहीत.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आधी मोबाईलवर फक्त हिंदी आणि इंग्रजीचे रेकॉर्डिग ऐकू येत होतं. मनसेच्या आंदोलनाने त्यात मराठी भाषा ऐकू येऊ लागली. तर मराठी नावाच्या पाट्या दुकानावर आल्या. आधी दुकानावर मराठी नसायच्या. परंतु दुसऱ्या राज्यात त्या त्या राज्यातील भाषेच्या पाट्या असतात. मग महाराष्ट्रात त्या मराठीत का नसावेत असा सवाल राज ठाकरे यांनी केला. प्रत्येक राज्याला त्या राज्याचा भाषेचा स्वाभिमान असतो. एक ओळख असते. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT