राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडाला असताना अलिबागमधील रस्त्यावर पैशांचा पाऊस पडल्याची घटना घडलीय. येथील स्थानिक नागरिकांना रस्त्यावर पाच-पाचशे रुपयांचे नोटा सापडल्या. ही घटना घडलीय अलिबाग तालुक्यातील गोंधळपाड रस्त्यावर. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना रस्त्यावर असं पैसे सापडत असल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान रस्त्यावर पैशांचा बंडल आणि खुल्या नोटा पडल्या होत्या. त्या कोणच्या होता त्याची माहिती कुणालाच मिळाली नाही. मात्र रस्त्यावर पडलेल्या नोटांच्या बंडल पाहून अनेकांनी हात साफ केला. बहुतेकजण नोटा घेऊन पसार झालेत. तर काही जागृक नागरीकांनी पोलिसांना खबर देते मिळालेले पैसे केले पोलिसांच्या स्वाधीन केलेत. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यात पैसे सापडण्याच्या घटनेला विशेष महत्त्व आलंय.
रस्त्यांवर पैसे पडलेले पाहून नागरिक पाचशे-पाचशे नोटा उचलून घरी घेऊन जात होते. एका प्रत्यक्षदर्शी म्हणाला, गोंधळपाडा रस्त्यावरून जात असतांना काही लोकांचा घोळका मला दिसला. त्यामुळे मी थांबलो, मला वाटलं अपघात झाला असावा, परंतु जवळ गेल्यानंतर वेगळचं सत्य समोर आलं. ते लोक रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलत होते. अनेकांना ५०० -५०० च्या नोटा जमा केल्या होत्या. काय झालं कोणाचे पैसे आहेत, असं प्रश्न करेपर्यंत सर्व लोक पैसे घेऊन पसार झालेत. त्यानंतर आमच्या हाती ५००ची लागली. त्यानंतर एका मुलीला २००० रुपये मिळाले. आम्ही त्यानंतर पोलिसांना कॉल केला आणि पुढील तपास पोलीस करत असल्याचं माहिती एका नागरिकाने दिली.
एका मुलीलाही रस्त्यावर पैसै सापडले. ती म्हणाली की, गोंधळपाडा रस्त्यावरून एसपी ऑफिसला जात होतो. त्यावेळी मला रस्त्यावर अडीच हजार रुपये सापडले. पैशांच्या बंडल पडले होते. तर काही खुल्या नोटा होत्या. त्यातून मला अडीच हजार रुपये सापडले, ते आपण पोलिसांना दिल्याची माहिती या मुलीने दिलीय.
काही दिवसापूर्वी सांगतील एका पाण्याच्या ओढ्यात पैसे वाहून आले होते. मतदारांवर 'पैशांचा पाऊस' पाडला जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोग लक्ष ठेवून असते. मात्र त्याच वेळी सांगली जिल्ह्यात एका ओढ्यामध्ये लाखो रुपयांची रोकड सापडली होती. सांगलीच्या आटपाडीत ही घटना घडली होती. येथील ओढ्यात नोटा वाहून आल्या होत्या. त्याही पाचशेच्या. हे पैसे घेण्यासाठी नागरिकांची धडपड उडाली होती.
पालघरच्या उधवा येथे तलासरी पोलिसांनी 4 कोटी 33 लाखांची रोकड जप्त केली असून ही रोकड दादरा नगर हवेलीतून महाराष्ट्रात येत असताना ही कारवाई करण्यात आली. तलासरीच्या उधवा तपासणी नाक्यावर ही रोकड आणि रोकड वाहतूक करणारी व्हॅन तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतली. यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय. निवडणुकांमध्ये सर्रासपणे पैशाचा वापर होत असून याची कसून तपासणी आता निवडणूक आयोगाने करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी केलीय.
नवी मुंबई क्राईम ब्रँच सेंट्रल युनिटने ८६ लाखांची रोकड जप्त केलीय. तीन बॅगमध्ये ही रोकड सापडली. होंडा सिटी कारमध्ये ही रक्कम सापडली होती. या कारमध्ये तीन जण होते. सीवूड सेक्टर ४६ येथे ही गाडी पोलिसांनी अडवली यातील तीन बॅगमध्ये ही रोकड सापडली. विनीत शर्मा हे इलेक्ट्रॉनिक वस्तूचे डिस्टीब्रुटर आहेत त्यांच्याकडे १५ लाखांची रोकड सापडली. तर लोकनाथ मोहिते हे पनवेलमध्ये राहणार असून ते टॅक्स कन्सल्टंट आहेत. त्याच्याकडे १८ लाख सापडले. तर रतीकलाल पटेल हे सी-वूडमधील खेळण्याचे बिझनेसमन असून त्याच्याकडे ५३ लाख ५० हजार रोकड सापडली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.