Devendra Fadnavis Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : भाजपची ९९ जणांची यादी आली; देवेंद्र फडणवीस, बावनकुळे मैदानात, पाहा कुणाला मिळाली संधी?

maharashtra assembly elections : महाराष्ट्र भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह ९९ जणांची यादी जाहीर करण्यात आली.

Namdeo Kumbhar

BJP releases list of 99 candidates for Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. देवेंद्र फणणवीस यांच्यासह ९९ जणांच्या या यादीमध्ये समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार २८८ जागांवर एकमत झालेय. भाजपने आज पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. श्रीजया चव्हाण या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिलेय. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

बेलापूर-ऐरोलीत विद्यमान आमदारांना पुन्हा संधी ?

बेलापूर मधून मंदा म्हात्रे आणि ऐरोली मधून गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. बेलापूर मधून मंदा म्हात्रे हंना उमेदवारी देण्यात आल्याने भकपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय. संदीप नाईक तुतारी हाती घेणार की अपक्ष लढणार याकडे लक्ष आता लक्ष लागलेय. संदीप नाईक निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

भाजपा कडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना पुन्हा भाजपा कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघात भाजपाकडून भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण तायडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सोलापूरमध्ये काय झालं?

सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या विरोधात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली होती. उमेदवारीला प्रचंड विरोध करण्यात आला होता. अनेक जण त्यांच्या विरोधात इच्छुक झाले होते. पक्षाकडे मागणीही करण्यात आली होती तसेच त्यांच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. परंतु भाजपने पुन्हा विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे. पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, माळशिरस या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस

कणकवली - नितेश राणे

घाटकोपर - राम कदम

चिमूर - बंटी बागडिया

नंदूरबार - विजयकुमार गावित

ऐरोली - गणेश नाईक

कामठी - चंद्रशेखर बावनकुळे

डोंबिवली - रवींद्र चव्हाण

मलबार हिल - मंगलप्रभात लोढा

पिंपरी चिंचवड - शंकरराव जगताप

धुळे शहर - अनुप अग्रवाल

जामनेर - गिरीश महाजन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Sakal Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT