Raj Thackeray MNS Manifesto : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आपला चारकलमी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. 'आम्ही हे करु' नावाने मनसेचा जाहीरनामा राज ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. १९ वर्षांमध्ये काय केलं, त्याची माहितीही मनसेकडून यावेळी देण्यात आली. मनसेच्या जाहीरनाम्यात औद्योगिक धोरण, मराठीचा सन्मान, रोजगार, प्रशासनात मराठी, उच्च शिक्षणात मराठी, महिला सुरक्षेवर भर, त्याशिवाय गड किल्ल्यांचं संवर्धन, आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे. मुलभूत गरजा आणि जीवनमान, हा पहिला मुद्दा असल्याचे यावेळी राज ठाकरे म्हणाले.
विषय आणि प्रश्न अजून बदलले नाहीत. आम्ही हे करु, या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध कऱण्यात आलाय. आम्ही काय करणार, हे जाहीरनाम्यात दिलेलं आहे, असे राज ठाकरे म्हणाले. त्याशिवाय १९ वर्षात मनसेनं काय काय केलं, याबाबातची सविस्तर पुस्तिका काढण्यात आल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. १७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कात होणाऱ्या सभेबाबातही त्यांनी मत व्यक्त केले. अद्याप १७ तारखेच्या सभेला परवानगी मिळालेली नाही. तयारीला फक्त दीड दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलाय, तयारीला वेळ लागतो. जेव्हा परवानगी मिळेल, तेव्हा पाहू, असे राज ठाकरे म्हणाले.
जाहीरनामा प्रसिद्ध करताना , अनेकांनी आम्ही काय करू हे दिलाय. २००६ साली महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणणार बोललो होतो. २०१४ साली ती प्रसिद्ध झाली. पण गेल्या दहा वर्षात कोणाला वेळ मिळाला नाही. २०१४ मधील तेच प्रश्न आजही आहेत, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसेच्या जाहीरनाम्यात काय काय?
पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला कायदा सुव्यवस्था, आरोग्य क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार, उच्च शिक्षण, औद्योगिक धोरण, प्रशासन आणि मराठीचा सन्मान, दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्रभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलविस्तारण, इंटरनेट उपलब्धता, पर्यावरण आणि जैवविविधता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.