Maharashtra Assembly Election SaamTv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं? वोटर आयडी नसल्यास काय करावे? हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठी खबरदारी घेतली आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदान करायचा जाताना हे ७ मुद्दे लक्षात ठेवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदान केंद्रावर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळेच यावेळी मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत.

वेबसाइट

मतदारांना मतदार यादीतील नाव शोधता यावे, यासाठी निवडणुक आयोगाने वेबसाइट उपलब्ध करुन दिले आहे. तुम्ही www.electoralsearch.eci.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुमचे ना शोधू शकतात. तुम्ही वेबसाइटवर जाऊन एपिक कार्ड किंवा मोबाईल नंबर लिहून मतदारांना नाव शोधता येईल.

नाव कसं शोधायचं?

तुम्ही निवडणुक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊन एपिक कार्ड नसल्यास अन्य माहितीवर क्लिक करा. त्यानंतर नाव, वडील, पतीचे नाव, जन्मतारीख टाकावी. यानंतर कॅपचा कोड भरावा. यानंतर सर्च बटणवर क्लिक केल्यावर सर्व माहिती उपलब्ध होईल.

अन्य ओळखपत्रे

जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही तरीही तुम्ही मतदान करु शकतात. तुम्ही १२ प्रकारची ओळखपत्रे दाखवून मतदान करु शकतात. यात जॉब कार्ड, बँकेचे किंवा टपाल पासबुक, स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड, लोकसंख्या कार्ड, पेन्शन कार्ड, ओळखपत्र, दिव्यांग कार्ड यांचा समावेश आहे.

रंगसंगतीनुसार मतदान

मुंबई आणि उपनगरात ८५० पेक्षा जास्त ठिकाणी ८ ते १० पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी मतदारांना चार रंगाच्या स्लीप देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तुम्ही मतदान केंद्रावप जावे, असं आवाहन करण्यात आले आहे.

गर्दी टाळण्यासाठी टोकन

मतदार केंद्रावर जास्त गर्दी होऊ नये, म्हणून यावेळी टोकनदेखील दिले जाणार आहे. वयोवृद्ध लोकांना स्वतंत्र टोकन दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मतदान करता येणार आहे.

नाव चुकीचे असल्यास

तुमचे मतदार यादीतील नाव चुकले असेल तर त्या ठिकाणी अधिकारी आणि प्रतिनिधी यांच्या मदतीने निर्णय घेतला जाईल. कोणालाही मतदानापासून वंचित ठेवले जाणार नसल्याचे सांगितले आहे.

ईव्हीएम गरम होत नाही

यावेळी ईव्हीएम मशीन योग्य पद्धतीने काम करेल यावर भर देण्यात आला आहे. केवळ व्हीव्हीपॅट यंत्रावर मोठा हॅलोजन लावण्याच्या पद्धतीने ईव्हीएम मशी गरम होऊ शकते. त्यामुळे काम हळूहळू होईल. त्याचमुळे निवडणुक आयोगाने आधीच खबरदारी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT