Maharashtra Politics Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Maharashtra Assembly Election: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. यंदाच्या निवडणुकीत ओबीसी आणि मराठा मतदार निर्णायक ठरणार आहे.

Girish Nikam

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसी हे दोन फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मराठा समाजाने वेगळी भूमिका घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत .

ओबीसी मतदार ठरणार 'गेम चेंजर'?

राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात मोठ्या घडामोडी झाल्या. राज्याने तीन बंड पहिली. याच काळात आरक्षणासाठी ओबीसी आणि मराठा समाजाचा संघर्षही पाहायला मिळाला. त्यामुळे ओबीसी आणि मराठा मतांचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने मराठा समाजाचं मतदान कोणाच्या पाठिशी उभा राहाणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याचबरोबर ओबीसी समाज कोणत्या पक्षाच्या पारड्यात कौल टाकणार यावर महायुती आणि महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election)

त्यामुळे ओबीसी व्होट बँकसाठी सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यात सुमारे 40 टक्के ओबीसी लोकसंख्या आहे आणि त्यांना 19 टक्के आरक्षण आहे. या निवडणुकीत ओबीसी मतदार गेम चेंजर ठरतील असं जाणकारांचं म्हणणं आहे. ओबीसींसोबत मुस्लीम मतंही या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष मुस्लिम आणि दलित मतांची बेगमी करताना दिसत आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार राज्यात 12 ते 13 टक्के मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. मात्र त्यांना तुलनेने तितकसं प्रतिनिधित्व मिळत नाही. मावळत्या विधानसभेत 10 मुस्लीम आमदार होते. यंदा एमआयएमने 14, महायुतीने 5 तर महाविकास आघाडीने 18 मुस्लीम उमेदवार दिलेत. 288 पैकी 26 ते 30 मतदारसंघात मुस्लीम समाजाचे थेट वर्चस्व असल्याचे दिसून येतंय. (Maharashtra Politics)

राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांचं प्राबल्य आहे ते पाहूयात....

राज्यातील मुस्लीमबहुल जिल्हे

मुंबई, ठाणे

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर

नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव

उत्तर महाराष्ट्र: धुळे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक.

पश्चिम महाराष्ट्र : सातारा, पुणे

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे 48 पैकी एकही खासदार मुस्लिम समाजाचा झाला नाही. पण विधानसभा निवडणुकीत ओबीसीबरोबरच मुस्लिम मतंही निर्णायक ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT