Maval Politics Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maval Politics: मावळ पॅटर्नची राज्यात चर्चा, सुनील शेळकेंसमोरबंडखोर बापू भेगडेंचं तगडं आव्हान

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष मावळ मतदारसंघाकडे लागले आहे. मावळ मतदारसंघात आता अपक्ष उमेदवाराला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.

Siddhi Hande

दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मावळात अजित पवार गटापुढे अपक्ष उमेदवाराचे मोठे आव्हानआहे. अपक्ष उमेदवाराला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. मावळात होणार दुरंगी लढत, शेळके यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात होणार मुख्य लढत...

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादीचे बंडखोर व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यातच मावळ विधानसभा मतदारसंघात थेट लढत होणार असल्याचे चित्र सध्या मावळात बघायला मिळते. सुनील शेळके यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या मावळातील भाजप नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात सहा जण आपलं नशीब अजमावणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे अशी थेट लढत होईल असे चित्र मावळत दिसत आहे. भेगडे यांना ट्रंपेट निशाणी मिळाली आहे. दरम्यान अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून शेळके व भेगडे दोघेही इच्छुक होते. मात्र भेगडे यांना उमेदवारी पासून बाजूला करण्यासाठी राज्य कृषी शिक्षण व संशोधन महामंडळाचे उपाध्यक्ष पद पक्षाने देऊ केले होते.

मात्र ते पद नाकारून मला मावळची उमेदवारी द्या असा आग्रह पक्षाकडे धरला होता. मात्र पक्षाने शेळके यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बापू भेगळे यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचाही राजीनामा देऊन पक्षाविरोधात बंड पुकारले होते. 2019 मध्ये बापू भेगडे यांनीच पुढाकार घेऊन सुनील शेळके यांना भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करून अजित पवार यांना साकळ घालून सुनील शेळके यांना उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता.

भाजपचे बाळा भेगडे यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येऊन सुनील शेळके यांना भरघोस मतांनी निवडून आणले होते. मात्र आता पुला खालून बरस पाणी वाहून गेला आहे. त्यावेळेला पाच वर्षासाठीच सुनील शेळके यांना आमदार करायचं आणि पुढल्या म्हणजेच 2024 ला दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यावी असे ठरले होते असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलतात . मात्र विद्यमान आमदार सुनील शेळके यांना राष्ट्रवादीचे तिकीट जाहीर होताच बापू भेगडे यांनी बंड करून सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान मावळमध्ये शेळके यांच्या वर नाराज असलेले सर्व राजकीय पक्ष एकवटले आहे. मावळ तालुक्यातील अपक्ष उमेदवार बापू भेगड यांना विजयी करण्यासाठी भाजप नेत्यांनी पदाचे राजीनामा दिले. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस, मनसे, यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही भेगळे यांना समर्थन दिले आहे. मात्र बापू भेगडे यांच्यासोबत मावळातील सर्व नेते असले तरी विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी 42 हजार कोटी निधी मावळच्या विकासासाठी आणला आहे. मावळातील कान्हा फाटा येथे जिल्हा रुग्णालय तयार केले. एकविरा देवी गडावर रोपवे चेही भूमिपूजन करण्यात आले.

पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या लोणावळ्यात स्काय वॉक सारखा मोठा प्रकल्प आणला. वडगाव येथे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, वन विभाग यासाठी मोठी इमारत तयार केली आहे. हे होत असताना मावळात मोठ्या प्रमाणात विकास कामे करत सिमेंटचे रोड पाणी यासारखे अनेक उपक्रम राबवून मावळचा विकास केला. त्यामुळे सध्या स्थितीत जनता शेळकेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. शेळके यांनी विकास केला ही जरी जमेची बाजू असली तरी बापू भेगडे यांच्यासोबत मावळातील सर्व नेते असल्याने बाजी कोण मारणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT