Maharashtra Election 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Vidhan Sabha Election: राज्यात एकीकडे राजकीय वातावरण गरम असतानाच दुसरीकडे तपासणी दरम्यान रोकड मिळण्याचं सत्र सुरुच आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे 280 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पाहूया एक रिपोर्ट

Girish Nikam

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात मोठा राजकीय संघर्ष पहायला मिळतोय. हे चित्र एकीकडे असतानाच दुसरीकडे आचारसंहिता काळात वाहनांच्या तपासणीत रोकड मिळण्याचं सत्र सुरुच आहे. अगदी मुंबई-पुण्यापासून राज्यभरातल्या कानाकोपऱ्यात पोलिसांच्या तपासणीत बेहिशोबी रोकड सापडत आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास 280 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेपेक्षा ही रक्कम खूप जास्त आहे.

एकट्या राज्यात 73.11 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 37.98 कोटी रुपयांची दारू, 37.76 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि 90.53 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, ज्या मतदारसंघांमध्ये प्रलोभन दाखविण्याची अधिक शक्यता आहे, राज्यभरातील असे 91 मतदारसंघ संवेदनशील मतदारसंघ म्हणून चिन्हांकित केले आहेत.

विधानसभा निवडणुकांची चुरस रंगात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं आणि पोलिसांच्या पथकाला राज्यभरात कुठे-कुठे रोकड सापडली ते पाहूया.

पुणे- खेड-शिवापूर टोल नाक्यावरून एका वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त

- सातारा- शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

- कसारा घाटात नाशिकहून मुंबईला जाणा-या गाडीत तब्बल 2 कोटींची रोख रक्कम सापडली

- पालघर- वाडा येथे 3 कोटी 70 लाखांची रोकड जप्त

- पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत 9 कोटी 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

- नालासोपारा, मांडवी आणि मिरा रोड मध्ये 7 कोटी 80 लाखांची रोकड जप्त

- विरारमध्ये 2 कोटी रुपयांची रोकड भरारी पथकाने जप्त केली.

निवडणुकीत पैशांचा सर्रास वापर केला जातो हे उघड आहे. मतदारांना पैशांचं आमिष दाखवलं जातंय. काही उमेदवारही पैसे घ्या पण आम्हालाच मतदान करा असं आवाहन करतायेत. या सगळ्या वातावरणात सुज्ञ मतदार आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मत देतील अशी अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT