Balapur constituency  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Balapur constituency : बाळापूर मतदारसंघात ठाकरे गटाची मशाल पुन्हा पेटणार का? महायुती कोणता डाव टाकणार? वाचा

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : शिवसेनेतील फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आणि नंतर गुवाहाटीहून परतलेले ठाकरे गटाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आले होते. मात्र त्यांच्याच बाळापूर मतदारसंघावरून आता महायुतीत ओढाताण सुरू झाली आहेय. महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी बाळापूरवर आपल्या दावा ठोकलाय. अजित पवारांचा राष्ट्रवादी गट, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपने या बाळापुर मतदारसंघ जागेवर दावा ठोकला. मात्र, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी कुणीही आपल्याविरोधात असलं तरी फरक पडणार नसल्याचं म्हटलंय.

अकोला जिल्ह्यात एकत्रित पाच मतदारसंघ आहेत. त्यापैकी चार मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. अकोला पूर्व मतदारसंघावर भाजपचे आमदार रणधीर सावरकर, आकोट मतदारसंघावर प्रकाश भारसाकळे, मुर्तीजापुर मतदारसंघात हरीश पिंपळे आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता आणि अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदारसंघात विदर्भातील ठाकरे गटाचा आमदार असलेला एकमेव मतदारसंघ. नितीन देशमुख हे आमदार आहेत.

2021 मधील राज्यातील ऐतिहासक सत्तानाट्यात हा मतदारसंघ आणि येथील आमदार देशमुख देशभरात चर्चेत आली आहे. याचं कारण ठरलंय सत्तानाट्यात शिंदे गटात गेलेले आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीतून परत येत उद्धव ठाकरेंची साथ देणं. त्यानंतर आमदार नितीन देशमुखांनी सातत्याने एकनाथ शिंदे, त्यांची शिवसेना, देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य केलं. त्यामुळे आता या मतदारसंघात देशमुखांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याची व्युहरचना महायुतीनं केली.

2019 मधील बाळापूर मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते.

उमेदवार - पक्ष - मिळालेली मते

नितीन देशमुख - शिवसेना - 69,343

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर - वंचित - 50,555

डॉ. रहमान खान - एमआयएम 44,507

विजयी - नितीन देशमुख.

दरम्यान, अकोला जिल्ह्यात जागा वाटपावरून आता बाळापूर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह आहेत. भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला. तर बाळापूर विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचा आमदार असल्याने या मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटानं मागणी केलीय. आता याच मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील दावा ठोकला. तर महायुतीतील एक घटकपक्ष असेलल्या जानकरांच्या रासपचीही बाळापुरात चाचपणी सुरू आहे.

महायुतीतील या पक्षांची ही नावे आहेत चर्चेत.

1)भाजप :

तेजराव थोरात, माजी आमदार बळीराम सिरस्कार, नारायण गव्हाणकर.

2)शिवसेना शिंदे गट :

माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ आणि माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप.

3)राष्ट्रवादी अजित पवार गट :

युवा नेते संदिप पाटील आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे

1)महायुतीकडं जिल्ह्यातील आम्ही तीन जागेची मागणी केली, चार जागांवर भाजपचे आमदार आणि त्या ठिकाणी त्यांचा क्लेम चालू शकतो. मात्र मागील निवडणुकीत आम्ही सर्व एकत्र असताना राष्ट्रवादीने ही जागा लढली होती. त्यामुळे या जागेवर आमचा हट्ट असणार आहे.

---अमोल मिटकरी, राष्ट्रवादी आमदार.

2) दावा प्रत्येक पक्ष करत असतो, परंतु अकोला लोकसभा मतदारसंघातील विचार केला तर बाळापुर आणि रिसोड असे दोन आमचे हक्काचे मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी आम्ही दावा केलेला आहे. आणि दोन्ही आमचे हक्काचे मतदारसंघ आहेत.

---रामेश्वर पवळ, प्रदेश समन्वयक, शिंदे शिवसेना

3) बाळापूर हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला मिळण्याचं जवळपास निश्चित आहेय. नितीन देशमुख येथून परत तळ ठोकून आहेय़. दरम्यान, या मतदारसंघात महायुतीतून कोणीही निवडणूक लढावं, आपल्याला भीती नाही.

---नितीन देशमुख, आमदार ठाकरे गट.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपचे आमदार आहे. त्यामूळे बाळापूर मतदारसंघावर ताबा मिळविण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशा तिरंगी लढतीचा हायव्होल्टेज ड्रामा रंगणार असल्याचे संकेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT