Pachora Assembly Election Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Sakal Exit Poll: पाचोऱ्यात किशोर पाटील होणार आमदार ? पाहा Exit Poll

Pachora Assembly Election Exit Poll Result: विधानसभा निवडणुकीत पाचोऱ्यातून किशोर पाटील हे संभाव्य आमदार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काल मतदान झाले. मतदानानंतर सकाळ माध्यम समुहाने एक्झिट पोल जाहीर केला आहे. एक्झिट पोलनुसार, पाचोरा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे पारडं जड असल्याचे दिसत आहे. शिंदे गटाचे किशोर पाटील हे संभाव्य आमदार आहेत.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर पाटील आणि ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यवंशी यांच्या लढत होत आहेत. पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. पाचोरामध्ये किशोर पाटील विजयी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पाचोरा मतदारसंघात पहिल्यांदाच खूप जास्त चुरस पाहायला मिळाली.या मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आहे.तसेच २ उमेदवारांनी पहिल्यांदाच अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक खूप महत्त्वाची ठरणार आहे. (Pachora Assembly Election)

पाचोरा मतदारसंघात ६८.७० टक्के मतदान झाले आहे. त्यात नवीन मतदारांचा मोठा समावेश आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदारांनी विकासाच्या नावावर मतदान करण्यास सांगितले. या मतदारसंघात कोण आमदार होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Pachora Exit Poll)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakal Exit Poll: फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Ramtek Vidhan Sabha : रामटेक विधानसभेत राजेंद्र मुळक होणार आमदार? पाहा एक्झिट पोल,VIDEO

Parbhani News : मध्यरात्रीच्या सुमारास घराला आग; परिवार थोडक्यात बचावला, एकजण गंभीर

Sakal Exit Poll: वरोरा विधानसभा मतदारसंघात करण देवतळे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Vijay Deverakonda : रश्मिकासोबतच्या अफेअरवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन, म्हणाला, मी ३५ वर्षांचा...

SCROLL FOR NEXT