Maharashtra Politics  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: जागा वाटपाला घटस्थापनेचा मुहूर्त! महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, 'मविआ'चे गणित काय? वाचा...

Maharashtra Politics Latest News: अमित शहा यांनी मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, मात्र अवास्तव जागांच्या मागणीचा आग्रह करु नये, असं म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसात होऊ शकते. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या जागा वाटपासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीमधील पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. आजपासून नवरात्रोउत्सवाला सुरुवात होत असतानाच आता जागा वाटपांचेही घट बसणार असल्याचे दिसत आहे.

महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने जवळपास ६० जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्याकडे सध्या ४२ आमदार आहेत. तसेच काँग्रेसकडून जवळपास ५ आमदार राष्ट्रवादीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आम्हाला किमान ६० जागा द्याव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अमित शहा यांच्या मुंबईत दौऱ्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्येही महत्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्यात महायुतीचंच सरकार आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिला. जागा वाटपाबाबत बोलताना अमित शहा यांनी मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, मात्र अवास्तव जागांच्या मागणीचा आग्रह करु नये, असं म्हटल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष १५५ ते १६० जागा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.

मविआच्या घटक पक्षांना हव्यात ४० जागा

लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला साथ दिलेल्या लहान घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीत मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या डाव्या पक्षांसह, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षाने विधानसभेच्या ४० जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. घटक पक्षांकडून आलेल्या या प्रस्तावावर येत्या ७ ते ८ ऑक्टोबरपर्यंत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मविआचे घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ११, समाजवादी पक्षाने १२ त्यासोबतच शेकाप आणि इतर पक्ष असे मिळून ४० जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता मविआचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT