Kopri-Pachpakhadi Assembly constituency Saam tv
Maharashtra Assembly Elections

Kopri-Pachpakhadi Assembly Constituency : शिवसेना फुटीनंतर CM शिंदे गड राखणार का? मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मविआतून कोण आव्हान देणार?

Kopri-Pachpakhadi Assembly constituency Election : शिवसेना फुटीनंतर CM शिंदे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीकडून कोण आव्हान देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

Vishal Gangurde

ठाणे : शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे भाजप आणि अजित पवार गटाच्या साथीने स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांची २००९ सालापासून या मतदारसंघावर पकड आहे. मात्र, शिवसेना फुटीनंतर राज्यातील समीकरण बदललं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री शिंदेंना कोण आव्हान देणार, यावर सर्व गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

शिवसेना फुटीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची मोठी परीक्षा असणार आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे ३ वेळा आमदर झाले आहेत. शिंदे यांचं तिन्ही वेळेला मताधिक्य सतत वाढत गेले आहे.

एकनाथ शिंदे २००९ साली ३२००० मतांनी जिंकले होते. २०१४ साली भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी शिंदे ५२ हजार मतांनी जिंकले होते. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत शिंदेंनी भाजपच्या संदीप लेले यांचा पराभव केला होता. पुढे २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंना १ लाख १३ हजार मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांना ८९ हजार मतांनी धूळ चारली होती.

कोपरी-पाचपाखाडीत शिंदेंचा राजकीय विरोधक कोण?

शिंदेंनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात राजकीय विरोधक शिल्लक ठेवला नाही, असं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारा कोणत्याही पक्षाचा स्थानिक नेताही मतदारसंघात नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान एकनाथ शिंदेंना दिलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता धूसर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून एकनाथ शिंदेंना कोण आव्हान देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

पक्ष फुटीनंतर समीकरण बदललं

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्याचं राजकारण बदलून गेलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या साथीला भाजप आणि अजित पवार गटाची साथ मिळणार आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढणार आहे. या पक्षफुटीमुळे एकनाथ शिंदे यांच्यापुढे महाविकास आघाडीचं तगडं आव्हान असणार आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून शिंदेंच्या विरोधात कोण उमेदवार असणार, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT