Vidarbha Politics saam tv
Maharashtra Assembly Elections

Vidarbha Politics : विदर्भात गडकरी आणि फडणवीस यांची ताकद झाली कमी? मविआ जिंकणार सर्वाधिक जागा? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवाडी आली समोर

vidarbha political news : काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या लोकपोल सर्व्हेत विदर्भाला कमी जागा दाखवण्यात येत आहे. सर्व्हेतील धक्कादायक माहितींनी महायुतीची झोप उडाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी विविध मतदारसंघात चाचपणी आणि मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर नव्या उमेदीने विधानसभेसाठी महाविकास आघाडी, महायुती आणि इतर राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एका नव्या सर्व्हेची जोरदार चर्चा होत आहे.

vidarbha

विधानसभेआधी जाहीर करण्यात आलेल्या लोकपोलच्या सर्व्हेत काही भागात महायुतीला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. विदर्भात भाजप आणि काँग्रेसची मोठी ताकद असल्याचं बोललं जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने दोन जागा जिंकल्या होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात बाजी मारत काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला होता. गडकरींनी १ लाखांहून अधिक मतांनी बाजी मारली होती.

लोकसभेत महायुतीचा बसला होता मोठा फटका

विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघापैकी २ ठिकाणी कमळ फुललं होतं. तर एका मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. तर महाविकास आघाडीने ८ जागा जिंकल्या होत्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ८ जागा जिंकल्याने महायुतीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. त्यामुळे विदर्भात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी झाली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान, २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १० जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ९ जागा जिंकल्या होत्या.

विदर्भात कोण मारणार बाजी?

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत कसं चित्र असेल, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या लोकपोलच्या सर्व्हेत महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीने विदर्भात जोरदार मुंसडी मारली आहे. विदर्भातील विधानसभेच्या ६२ जागांपैकी महायुतीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी ४० ते ४५ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT