Sameer Wankhede  yandex
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : समीर वानखडेंची राजकारणात एन्ट्री, मुंबईत महायुतीकडून मैदानात उतरणार?

Sameer Wankhede News : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आता राजकारणात उतरणार असल्याचे समोर आलेय. ते महायुतीकडून मुंबईमधील धारावीत निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Maharashtra Assembly Election 2024 : भारतीय महसूल सेवेचे (IRS) अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) मैदानात उतरणार आहेत. समीर वानखेडे मुंबईमध्ये मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मविआ सरकारच्या काळात समीर वानखेडे चर्चेत आले होते. समीर वानखेडे सध्या चेन्नईमध्ये सरकारी नोकरी करत आहेत. (2024 Maharashtra Legislative Assembly election)

मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. धारावी विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून IRS अधिकारी समिर वानखेडे यांच्या नावाची चाचपणी शिवसेनेकडून केली जातेय. वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात समीर वानखेडे यांना शिंदेसेना उतरवण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड संसदेत गेल्या आहेत. या मतदारसंघात आता ज्योती गायकवाड काँग्रेसकडून लढणार असल्याचे समजतेय. ज्योती गायकवाड यांच्याविरोधात समीर वानखडे लढणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. मुंबईतील धारावी हा राखीव मतदारसंघ आहे, या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला होता. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेत त्या खासदार झाल्या. आता त्यांच्या जागी काँग्रेसकडून ज्योती गायकवाड उतऱणार असल्याचं समजतेय. महायुतीच्या जागावाटपात धारावीचा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांना मिळालाय, त्याजागी समीर वानखेडे मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

SCROLL FOR NEXT