Imtiaz Jaleel Former  
Maharashtra Assembly Elections

Lok Sabha by-election: जरांगे-जलील यांच्या भेटीमागील कारण आलं समोर; नांदेडमध्ये वाढलं मविआ-महायुतीचं टेन्शन

Nanded Lok Sabha by-election: इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभेची पोट निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे महायुती आणि मविआचं टेन्शन वाढलंय.

Bharat Jadhav

आचारसंहिता लागू झाल्यानंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला आव्हान देत निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ करणार असल्याचा पावित्रा घेतला. त्याच दरम्यान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल होतं.

मनोज जरांगे पाटील हे एमआयएमशी युती करणार का? दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, असे प्रश्न उपस्थित केले जावू लागले. मात्र या भेटीमागील नेमकं कारण आता समोर आलंय. इम्तियाज जलील हे नांदेड येथून लोकसभा पोटनिवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. नांदेड येथून इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान याबाबत स्वत: जलील यांनी माहिती दिली. नांदेडमधील कार्यकर्ते आपण येथून निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही आहेत. एमआयएमला जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हा सगळ्यात जास्त प्रतिसाद नांदेड येथे मिळाला होता.

आता जलील यांनी पोटनिवडणूक लढवावी अशी मागणी केली जात आहे. त्यावर बोलतांना जलील म्हणाले, संधी आल्यास का प्रयत्न करू नये. येथून निवडणूक लढवावी का नाही हे आपल्यावर सोडण्यात आले आहे. त्यासाठी चाचपणी करून लढवावे की नाही हे ठरवण्यासाठी सांगण्यात आल्याचं जलील म्हणालेत. मात्र मी कुठून निवडणूक लढणार हे औवेसी साहेब ठरवणार आहेत.काही जागांवर ते जातीने लक्ष घालत असल्याचा खुलासा जलील यांनी केलाय.

दरम्यान जलील यांच्या घोषणेमुळे त्यांचा सामना काँग्रेसचे येथील उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने अद्याप येथून उमेदवार दिला नाही. दरम्यान, जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथून विधानसभा निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले आहेत. इम्तियाज जलील म्हणाले, मला नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळत आहे. तसेच लोकांमध्ये देखील रोष पाहायला मिळतोय.

मी महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार होतो, मला पाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी कशी मेहनत घेतली, हे तर सर्वांना माहीतच आहे. एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला होता. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाहीत.

भाजपची 'बी' टीम आम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांना काडीचेही महत्त्व देत नाहीत. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करु? आम्ही आमच्या पक्षाबाबत विचार करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

जरांगे-जलील यांच्या भेटीला महत्त्व

मराठा समाजाच्या मतांचं गणित साधण्यासाठी जलील यांनी जरांगे पाटील यांटी भेटल्याचं म्हटलं जात आहे. जुले महिन्यात जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली होती तेव्हा नांदेडमध्ये त्यांनी सभा घेतली होती. त्या सभेला मोठा मराठा समाजाचे लाखो लोकांनी हजेरी लावली होती. त्याच गोष्टीचा फायदा जलील घेत जरांगे यांच्याशी सूत जुळवत असल्याचं म्हटलं जात आहे. मराठा मतदार आपल्यालाकडे वळवण्यासाठी जलील जरांगेंची मदत घेत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या जून्या कोपरी पुल आठ दिवस वाहतूकीसाठी बंद...

Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस 19'ची पहिली झलक; चक्क लोगो बदलला, पाहा VIDEO

Avoi Snacks: चहासोबत बिस्किटे, ब्रेड किंवा पकोडे खाणे का टाळावे? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल, उपसचिवांमध्ये संताप; न्यायालयात जाण्याचा इशारा

Manikrao Kokate: इडापिडा टळो, संकट दूर होवो; माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन|VIDEO

SCROLL FOR NEXT