Pawar Family Diwali Padwa Baramati SAAM TV
Maharashtra Assembly Elections

Diwali Padwa 2024 : बारामतीमध्ये आज दोन दिवाळी पाडवे, नात्यानंतर आता सणातही फूट

Pawar Diwali Padwa : राजकीय संघर्षामुळे यंदा मात्र पवार कुटुंबात दोन पाडवे होणार आहेत. नात्यानंतर आता सणातही फूट पडल्याची चर्चा सुरु झाली.

Namdeo Kumbhar

Baramati Pawar Diwali Padwa : बारामतीमध्ये आज दोन दिवाळी पाडवे साजरे होणार आहेत. ⁠माळेगाव येथील गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार नागरिक कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना भेटणार आहेत. तर यावर्षी प्रथमच काटेवाडी येथील निवासस्थानी अजित पवार यांचा देखील दिवाळी पाडवा (Pawar Family Diwali Padwa Baramati) होणार आहे. ⁠काटेवाडी येथील निवासस्थानी अजित पवार हे देखील नागरिकांना दिवाळी पाडव्यानिमित्त भेटणार आहेत. ⁠गोविंद बागेत पहाटेच शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली. ⁠गोविंद बागेत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

गेल्या पन्नास वर्षांपासून बारामतीमध्ये शरद पवार दिवाळी सण साजरा करतात. दिवाळी पाडव्याला गोविंद बागेतील त्यांच्या निवासस्थानी राज्यभरातले कार्यकर्ते आणि स्नेहींना ते भेटतात. ती एक परंपरा झाली आहे. राजकीय संघर्षामुळे यंदा मात्र पवार कुटुंबात दोन पाडवे होणार आहेत. नात्यानंतर आता सणातही फूट पडली आहे. (For the first time Sharad Pawar Ajit Pawar won’t celebrate Diwali Padwa together in Baramati )

काकांचा पाडवा गोविंदबागेत, दादांचा काटेवाडीत

राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यावर पवार कुटुंबातही मोठी दरी निर्माण झाली आहे. लोकसभेला अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव, विधानसभेला पुतण्या युगेंद्र पवारांना उमेदवारी या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये पवार काका-पुतण्यामध्ये दरी वाढत चालली आहे. एव्हढच नाही तर बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा दिवाळी पाडवा वेगळा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच हे स्पष्ट केलंय. दरवर्षी गोविंदबागेत पवार कुटुंबाचा पाडवा साजरा होतो.. राज्यभरातले हजारो कार्यकर्ते पाडव्यानिमित्त शरद पवारांची भेट घेतात.. या पाडव्याला संपूण पवार कुटुंब एकत्र असतं. यंदा मात्र तस चित्र नसेल.

गेल्या पन्नास वर्षांपासून बारामतीमध्ये शरद पवार हे दिवाळी सणानिमित्त गोविंद बागेतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटतात. परंतु आता पवारांच्या घरातच फूट पडली आहे, पक्षही फुटला आहे. मात्र पवारांच्या कुटुंबातील नात्यांमधला कडवटपणा दूर व्हावा. गोडवा टिकावा, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यंदा दोन ठिकाणी पाडवा असल्यानं बारामतीकर कुठं जाणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT