Devendra fadnavis on maratha aarakshan Saam Digital
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Elections 2024: मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला.

Namdeo Kumbhar

Devendra fadnavis on maratha aarakshan : विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला.

पण मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, मराठा समजाच्या मंडळाला भरीव आर्थिक तरदूत दिली आहे, त्यामुळे मराठा समाज पूर्ण ताकदीने महायुतीच्या बाजूने उभे राहील. मराठा समजाची सहानभुती मला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीला पाठिंबा देईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली होती.

मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुला पाठिंबा मिळेल. मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील. मराठा समाजातील ८० टक्के जनता हिंदुत्ववादी असून २० टक्के पुरोगामी असावेत. मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजीने उभा राहिला आहे, अे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेय.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मविआकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. पण मराठा समजाला आरक्षण देणं, सारथी संथा, समाजासाठी भरीव आर्थिक तरदूत देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूती आहे, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा समाजात चुकीचे कथानक पसरवण्यात आले. मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवण्यता आला. त्यामागे मराठा समजाची नाराजी नव्हती. तर मविआमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचां हात होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुण्यात फडणवीस यांच्या दोन सभा -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज पुण्यात दोन सभा होणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुरंदर सासवड येथे विजय शिवतारे यांच्यासाठी एक सभा होणार आहे. आज पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली सभा पर्वती विधानसभा मतदारसंघात होत आहेत.

भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ धनकवडी परिसरात सायंकाळी साडेपाच वाजता सभेचे आयोजन केले आहे. तर कसबा विधानसभा मतदार संघातील शनिपार इथे हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ सायंकाळी साडेसहा वाजता सभा होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT