Devendra Fadnavis Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Batenge toh katenge: योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केलेय.

Namdeo Kumbhar

Devendra Fadanvis on Batenge toh katenge: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे महायुतीमध्ये मतमतांतरे असल्याचं दिसून आलेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांनी उघडपणे या घोषणेला विरोध केला होता. बटेंगे तो कटेंगे यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेय. योगींच्या घोषणाला राज्यभरातून अनेकांनी विरोध दर्शवला असतानाच आता माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगींच्या घोषणेला एकप्रकारे समर्थनच केलेय.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलेय. बटेंगे तो कटेंगे या घोषणाबाजीत काहीही चुकीचे दिसत नसल्याचे सांगत हा आपल्या देशाचा इतिहास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेबाबत विचारले. मला योगीजींच्या घोषणेमध्ये काहीही चुकीचे दिसत नाही. या देशाचा इतिहास पाहा, जेव्हा-जेव्हा हा देश जाती, प्रांत आणि समुदायांमध्ये विभागला गेला तेव्हा, हा देश गुलाम झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला हे समजत नाही की जर कोणी म्हणत असेल की फूट पाडू नका, तर त्यावर आक्षेप घेण्याचा काय अर्थ आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ओबीसी समाजात विरोधक फूट पाडत आहेत, मोदींच्या आरोपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यामुळे हेतू उघड झाले आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचे हेतू स्पष्ट होतात. कदाचीत राहुल गांधी यांना मिडिया सर्वत्र पाठलाग करत असल्याचे त्यांना माहित नसावे, त्यांनी चूक केली, असेही फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांनी जेव्हा अमेरिकेत जाऊन संविधान आणि आरक्षणावर विधाने केली होती. तेव्हा त्यांची मानसिकता उघड झाली होती. ते ज्या पद्धतीने विविध जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, ते पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप बरोबरच आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

आरक्षणावर काय म्हणाले फडणवीस ?

मागासवर्गीय आणि अनुसूचित जमाती समुदायांमध्ये अनुक्रमे 350 आणि 54 उपजाती आहेत. जर या 350 जाती वेगळ्या केल्या तर त्यांचा दबाव कमी होईल. जर आपण एसटीबद्दल बोललो, तर 54 वेगवेगळ्या आदिवासी जमातींचा एक एसटी गट बनतो. 'भारत जोडो'मधून या गटामध्ये अराजकता पसरवण्याचे काम झालेय. हे लोक भारत जोडो करत नाहीत, त्यांना भारताचे विभाजन करून नष्ट करायचे आहे, आरोप फडणवीस यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजू-सलमानची जोडी; साकारणार 'ही' खास भूमिका

Maharashtra Live News Update: सांगलीतील शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग काढून टाकली

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

Shocking News : धक्कदायक! वर्क लोड आला म्हणून नर्सने केली १० रुग्णांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

SCROLL FOR NEXT