Maharashtra Election : शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म पवारांचं, भुजबळांचा पवारांवर प्रहार SaamTV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म पवारांचं, भुजबळांचा पवारांवर प्रहार

chhagan bhujbal vs sharad pawar : भुजबळांच्या बंडाची 'साम'वर इनसाईड स्टोरी, त्यावेळी नेमकं काय झालं होतं? भुजबळांनी शिवसेना का सोडली?

Namdeo Kumbhar

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra Assembly elections: शरद पवारांनी येवल्यात जाऊन भुजबळांना पाडण्याचं आवाहन केल्यानं भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत. तर भुजबळांनी 1991 चा संदर्भ देत पवारांवर हल्लाबोल केलाय. त्यावरून चांगलंच राजकारण रंगलंय. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीवरून वातावरण तापलंय. त्यातच शरद पवारांनीच 1991 मध्ये पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म केल्याची टीका छगन भुजबळांनी केलीय... त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.. तर शिवसेनेच्या मंडल विरोधी भूमिकेमुळे शिवसेना सोडल्याचं भुजबळांनी सांगितल्याची आठवण राऊतांनी करून दिलीय.

भुजबळांच्या आरोपानंतर खुद्द शरद पवारांनीच साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत भुजबळांनी शिवसेना सोडल्याची इनसाईड स्टोरी सांगितलीय.

भुजबळ सोडून गेल्यामुळे शरद पवार चांगलेच इरेला पेटलेत.. त्यामुळेच त्यांनी भुजबळांना पाडण्याचा निर्धारच केलाय. त्यामुळे भुजबळांनीही पवारांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केलेला दिसतोय. त्यामुळेच त्यांनी जुना संदर्भ देत पक्षफोडीचं राजकारण पवारांनीच सुरु केल्याचं ठसवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत कोण बाजी मारणार याचा निकाल 23 तारखेलाच लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

SCROLL FOR NEXT