Maharashtra Assembly Elections

Assembly Election: जयश्री थोरातांवर भाजपचे देशमुख बरळले; नगरमध्ये पुन्हा विखे-थोरात विकोपाला

Assembly Election: अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा विखे-थोरात विकोपाला गेला आहे. ऐन निवडणुकीत जाळपोळ-तोडफोड होऊ लागलीय. त्याचं काय कारण आहे हे जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

भाजपच्या वसंतराव देशमुखांनी बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरातांविषयी अश्लील वक्तव्य केलं आणि पुन्हा थोरात आणि विखे वाद उफाळून आलाय..मात्र हा वाद नेमका काय आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

हे पाहा, जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड. ही दृश्य आहेत. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील धांदरफळ गावातील. भाजप नेते वसंत देशमुखांनी बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरातांविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केलंय.

जयश्री थोरातांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे वसंत देशमुख कोण आहेत? पाहूयात.

कोण आहेत वसंत देशमुख?

वसंतराव देशमुख हे दिवंगत बाळासाहेब विखेंचे समर्थक

वसंतराव देशमुख विखे कुटुंबियांशी एकनिष्ठ तर थोरात कुटुंबाचे कट्टर विरोधक

थोरात गटाविरोधात स्थानिक निवडणुकांमध्ये संघर्ष

विखे समर्थक असले तरी भाजपचं कुठलंही पद नाही

सुजय विखेंच्या सभेत वसंत देशमुखांनी वक्तव्य केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटलेत. तर सुजय विखेंच्या स्टेजवर हे वक्तव्य केल्याने हिच भाजपची मानसिकता असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केलाय. तर भाजपनेही वसंत देशमुखांवर कठोर कारवाईची मागणी केलीय. वसंत देशमुखांनी विखेंच्या स्टेजवर वक्तव्य केल्याने काँग्रेसने भाजपला चांगलंच धारेवर धरलंय.. तर आपल्यावर हल्ल्याचा नियोजित कट रचल्याचा आरोप सुजय विखेंनी केलाय.. दुसरीकडे माझ्याबद्दल कितीही खालच्या पातळीची वक्तव्य केले तरी मी थांबणार नसल्याचा निर्धार जयश्री थोरातांनी केलाय.

जयश्री थोरातांविषयी वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी वसंत देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर खालच्या पातळीवर गेलाय.. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांनी आणि जबाबदार नेत्यांनी वाचाळवीरांना आवर घालायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT