Devendra Fadnavis  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly : भाजपच्या १०० नावांवर शिक्कामोर्तब, यादी उद्या येणार, शिंदेंची आज शहांसोबत बैठक!

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १०० जागांवर शिक्कामोर्तब केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये बुधवारी अडीच तास बैठक झाली, त्यामध्ये १०० जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीत बैठकीनंतर भाजपच्या वाट्याला आलेल्या उर्वरित जागांवर पक्षाची मंजुरी मिळाल्यावर 90 टक्के जागांची एकत्रित घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज येणार नाही. बुधवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत 100 पेक्षा अधिक नावांवर शिक्कामोर्तब झालेय. महायुतीत बैठकीनंतर भाजपच्या वाट्याला आलेल्या उर्वरित जागांवर पक्षाची मंजुरी मिळाल्यावर 90 टक्के जागांची एकत्रित घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या बाकी जागांवर चर्चा होऊन भाजप अध्यक्ष उर्वरित जागांची नाव निश्चित करणार आहेत.

शनिवारी भाजपच्या 90 टक्के उमेदवारांची यादी एकत्रित येण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीत अनेक विद्यमान मंत्री आणि काही आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. मात्र रिपोर्ट खराब असलेल्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. उर्वरित नावांवर शिक्कामोर्तब करण्या साठी CEC ची बैठक पुन्हा होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी

Railway IRCTC Share : रेल्वेची मोठी घोषणा अन् शेअरमध्ये अचानक झाली पडझड; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates : इम्तियाज जलील नांदेड येथून लोकसभा पोटनिवडणूक लढणार

Bhusawal News : फुटबॉल कोचिंग करून परतताच मृत्यूने गाठले; स्विच बंद करताना विजेचा जोरदार झटका

Amravati News : रवी राणा यांना मोठा धक्का ! जितू दुधानेंनी सोडली राणांची साथ | Video

SCROLL FOR NEXT