Sharad Pawar Speech Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

Sharad Pawar Rally : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी बारामतीकरांना मोठं आवाहन केलंय.

Bharat Jadhav

शिक्षणासाठी बारामती विद्या प्रतिष्ठान काढले, माळेगावला शारदा निकेतन काढले. मी बारामतीत आलो की २००- ३०० लोक मला भेटायला येतात. जे पदवीधर असतात त्यांना नोकरी हवी असते. मात्र ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांनी काय केलं? त्यांनी राज्यातील उद्योग गुजरातला पाठवले. शरद पवार यांनी बारामती येथील लेंडीपट्टा येथील मैदानावर युगेंद्र पवार यांच्यासाठी सांगता सभा घेतली.

या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसह राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. राज्यातील सरकारने उद्योग गुजरातला पळवले, तर पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. ते फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखं वागत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले नाही,अशी घणाघाती टीका शरद पवारांनी केली.

राज्यातील आणि देशातील ⁠शेतकरी, महिला,युवकांची ही अवस्था बिकट असल्याचं शरद पवार म्हणाले. ⁠मी बारामतीच्या आजुबाजुच्या गावात एमआयडीसी काढली. त्याची सुरुवात जेजुरीपासुन केली. इंदापुरला, बारामतीला एमआयडीसी काढली, नगर रस्त्यावर राजंनगाव लोणंदला काढली. मात्र आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी काय केलं? त्यांनी महाराष्ट्रतले उद्योग गुजरातला पाठवले, असा घणाघात शरद पवारांनी सांगता सभेत केला.

कुणासाठी हे सरकार चाललंय?

नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. याचा त्यांना विसर पडला आहे.अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का? सवाल शरद पवार यांनी यावेळी केला. लोकसभेचा निकाल देशाला दाखवून दिलं की महाराष्ट्र काय चिज आहे. देशाचा कारभार करायचा असेल तर ४०० खासदारांची गरज नसते. घटनेत बदल करायचा असेल तर ४०० खासदार लागतात. त्यामुळे मोदींचा हेतु काय होता हे स्पष्ट आहे. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मोदी साहेबांचा हा हेतू पूर्ण होऊ दिला नाही. मोदींना आवर घालण्यासाठी तुम्ही मदत केली. ⁠बहिणीचा सन्मान करायला माझी हरकत नाही. पण आज बहिणीची अवस्था काय आहे.

शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकार माफ करू शकत नाही- शरद पवार

राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजनेवर बोलताना पवार म्हणाले, एकीकडे सरकार महिलांचा सन्मान केल्याचं म्हणत आहे, पण दुसरीकडे अत्याचार वाढलेत. राज्यातील ६४ हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा थांगपत्ता लागत नाही. शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्रात २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ⁠शेतीमालाला भाव नाही, कर्जबाजारीपणामुळे या आत्महत्या झाल्या.नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना कर्ज परत फेडीसाठी काही ना काही मदत केली पाहिजे होती. मात्र त्यांनी १६ उद्योजकांचे १८ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. मात्र शेतकऱ्यांचं काही हजारांचे कर्जमाफ केले नाही असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

युगेंद्र पवार यांच्याासाठी मत मागताना शरद पवार म्हणाले, पक्षाने त्यांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं. ⁠त्यांनी काम केलं माझं काही म्हणणं नाही. ⁠तुम्ही माझी निवड केली, त्यानंतर अजित पवार यांची निवड केली. आता युगेंद्र पवार यांची निवड करा. ⁠त्यांनी प्रत्येक गावात फिरुन माहिती घेतली आहे. प्रश्न समजून घेतलेत. ⁠देशात कोठेही जा, बारामतीचं नाव घेताच लोक आणखी एक नाव घेतात. कोणाचं नाव घेतात, ते म्हणजे शरद पवार. ⁠आमच्यापेक्षा जास्त जोमाने काम करण्याची धमक युगेंद्रमध्ये आहे. त्यांना साथ द्या, असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT