Maharashtra Assembly Election: आता बातमी आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत. राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पाहूया एक रिपोर्ट.
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सरस कामगिरी झाली होती. पक्षाने दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाकडून सुनील तटकरे यांच्या रुपाने एकच उमेदवार निवडून आला होता. विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांच्या पक्षात जोरात इनकमिंग झालं आहे.
पक्ष फुटी नंतरच्या राजकीय संघर्षात दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांनी रान उठवलं आहे. अनेकदा वादग्रस्त विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका करताना जीभ घसरलीये. अजित पवारांचा गट ही पाकीटमारांची टोळी आहे, असं विधान त्यांनी केलंय. तर आव्हाडांनी जपून शब्द वापरावे, असा सल्ला वजा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय.
आव्हाडांनी केलेल्या टीकेला रुपाली ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय..'जितेंद्र आव्हाड ही व्यक्ती नाही प्रवृत्ती आहे असा पलटवार मिटकरींनी केलाय. तर आव्हाड आपल्या विधानावर ठाम आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेण्यावरुन शरद पवारांनीही पुतणे अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता आव्हाडांनीही तिखट भाषेत दादांवर निशाणा साधल्यानं याचा मतदारांवर काय परीणाम होणार हे महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.