BJP - Thackeray Worker Rada Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

BJP - Thackeray Worker Rada: मतदार स्लीप वाटण्यावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या बाहेरच आमनेसामने आलेत.

Bharat Jadhav

Maharashtra Vidhan Sabha: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सावतानगर परिसरात दोन गटात वाद झाला. येथे भाजप ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. स्लीप वाटण्यावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. भाजप आणि ठाकरे गटाच्या दोन्ही समर्थकांची अंबड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झालीय. हाती आलेल्या माहितीनुसार, सुधाकर बडगुजर यांची गुंड असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्याने केलाय.

या राड्यानंतर भाजपचे माजी नगगरसेवक मुकेश शहाणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या गुंडांनी माझ्यावर गोळीबार केल्याचा असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. भावाने माझ्यावरील गोळी चुकवल्याने मी वाचलो . मात्र भावावर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.

पंकजा मुंडे यांची सभा होती, आम्ही सभा स्थळी होतो. त्यावेळी आम्हाला माहिती पडले की, काही भाजपच्या कार्यकर्त्यांना पकडलंय. त्यांना मारझोड केली जात आहे. मग आम्ही लोक तेथे गेलो. त्यावेळी तेथे काही लोक पैशांचे वाटप करत होते. त्याचा व्हिडिओही आमच्याकडे आहे. मग तेथे गुंडगिरी करणारे काही लोक आले. त्यांनी माझ्यावर गोळीबार केला.

आमचे कार्यकर्ते आणि त्यांचा झटापटी झाल्या. ते मोठ्या संख्येत होते.त्यावेळी त्यांनी माझा लहान भाऊ प्रविण चव्हाण यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यांनी हवेत गोळीबार केला असून त्याचा व्हिडिओदेखील मिळवला जात आहे.सुधाकर बडगुजर यांची ते गुंड होती, असा आरोपही शहाणे यांनी केलाय.बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहाणे यांनी केलीय. नाहीतर बडगुजर यांचे गुंड आमच्या घरात घुसून आमच्या आया-पोरांना मारून टाकतील, असंही ते म्हणाले.

अंबड पोलीस स्टेशनबाहेरील राडा झाल्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या अंबड पोलीस स्टेशनात दाखल झाल्यात. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दौषींवर कारवाई करावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केलीय. नाशिक सारख्या शहरात अशा गोष्टी घडणं. त्यात एक महिला उमेदवार निवडणूक लढत असताना अशा गोष्टी घडणं हे चुकीचे आहे. माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय त्याचा आपण निषेध करत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

अंबड पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आलीय. ITBP ( इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस ) जवानांची तुकडी अंबड पोलीस ठाण्याच्या परिसरात तैनात करण्यात आलीय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक देखील अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेत. अंबड पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT