Maharashtra Assembly Elections

Konkan Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के; कोकणातील दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला रामराम

Maharashtra Assembly Election: ऐन निवडणुकीच्या काळात अजित पवार यांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. कोकणातील दोन पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. त्यामुळे अजित पवार यांची चिंता वाढलीय.

Bharat Jadhav

सागर कदम, साम प्रतिनिधी

रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय. महाड विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. खानविलकर हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच उमेदवारीसाठी नेत्यांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे. तर नाराज उमेदवार तिकीटासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महायुतीला महाड विधान सभा मतदार संघात मोठा झटका बसलाय. या पक्ष बदलाचा मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह्यावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिलासा. मात्र पक्षातील बंड आणि होणारी ऑऊटगोइंग पाहता ऐन निवडणुकीच्या काळात अजित पवारांची चिंता वाढलीय. दररोज कोणता ना कोणता नेता किंवा पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकत आहे. अजित पवारांना कोकणातून एकाच दिवसात दोन धक्के मिळालेत. सकाळी राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील नेते अजित यशवंतराव यांनी पक्षाला रामराम ठोकला.

त्यानंतर संध्याकाळी रायगडमधील महाड विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर पक्ष सोडत असल्याची बातमी समोर आली. बाबू खानविलकर हे अजित पवार आणि सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय आहेत. बाबू खानविलकर देखील ठाकरे गटात सामील होणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत निजामपूर विभागातील अनेक पदाधिकारीही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गट सोडण्याबाबत निर्णय का घेतला यासंदर्भात बाबू खानविलकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

यंदाची निवडणूक युतीतून लढवली जाणार आहे. त्यामुळे महाड विधानसभा मतदारसंघातील जागा शिंदे गटाला सुटली. शिंदे गटाकडून भरतशेठ गोगावले हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आपण नाराज असून आपण आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सोपवलाय. येणाऱ्या २८ तारखेला उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटात आपण प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कोण आहेत बाबू खानविलकर

बाबू खानविलकर लवकरच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. खानविलकर हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आहेत. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत खानविलकर. खानविलकर यांच्यासोबत निजामपूर विभागातील अनेक पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार आक्रमक होत त्यांनी राज्यातील प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढलाय. महायुतीतील नाराज उमेदवारांना घेरत त्यांचा आपल्या गटात प्रवेश करून घेत महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. त्यात आता ठाकरे गटाकडून अजित पवार यांना धक्के दिले जात आहेत. एकाच दिवसात दोन धक्के राष्ट्रवादीला लागलेत. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऑऊटगोइंगमुळे अजित पवार यांची चिंता वाढलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Deshmukh: 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'; पुस्तकातून अनिल देशमुखांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Assembly Election: पुण्यात कारमध्ये सापडली 5 कोटींची रोकड; पोलीस, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं मात्र मौन

Maharashtra Election : अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना संदिप देशपांडे देणार टक्कर; वाचा मनसे उमेदवारांची यादी

Maharashtra News Live Updates: खडकवासलामधून मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

Dana Cyclone Alert : 'दाना' चक्रीवादळ उडवणार दाणादाण! २ राज्यांत शाळा-कॉलेज बंद, रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT