Nana Patole News Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Nana Patole News: 'शिवद्रोही सरकार सत्तेतून काढणे हाच अजेंडा..' नाना पटोलेंनी सांगितला 'मविआ'च्या जागा वाटपाचा मुहूर्त!

Maharashtra Assembly Election 2024: 'एक दोन दिवस वेळ लागेल जागावाटप योग्य पद्धतीने केले जाईल. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी,परवा एकत्र येत आहोत, लवकरच जागावाटप जाहीर करू', असं नाना पटोले म्हणाले.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ३ ऑक्टोबर

Nana Patole On MVA Seat Sharing: महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही हे सरकार सत्तेतून काढणं हा आमचा पहिला अजेंडा आहे, त्यामुळे प्रत्येक जागेवर बारकाईने अभ्यास करून जागा सिलेक्ट करत आहोत, असे म्हणत राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे. तसेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येत आहोत, लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करु, असं ते म्हणालेत.

काय म्हणाले नाना पटोले?

'महाविकास आघाडीमध्ये सगळे सिस्टमॅटिक सुरू आहे, प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे. निवडून यायचे या मेरिटवर जागा द्यायचा असा निर्णय झाला आहे, थोडा दिवस लागेल. एक दोन दिवस वेळ लागेल जागावाटप योग्य पद्धतीने केले जाईल. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी,परवा एकत्र येत आहोत, लवकरच जागावाटप जाहीर करू. ज्याचं मेरिट असेल त्या पक्षाने लढावं, कारण महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही हे सरकार सत्तेतून काढणं हा आमचा पहिला अजेंडा आहे, त्यामुळे प्रत्येक जागेवर बारकाईने अभ्यास करून जागा सिलेक्ट करत आहोत, एखादी जागा सगळेच मागत आहेत, हे सर्वच पक्षात चालत आहे,' असे मोठे विधान नाना पटोलेंनी केले.

जनतेच्या पैशांची लूट...

'मुठभर उद्योगपतींना ज्या पद्धतीने राज्याची तिजोरी लुटून दिली जात आहे त्यामुळे लाडकी बहीण, निराधार योजनांना पैसे मिळत नाहीत. म्हणून गडकरींनी देखील त्यावर आक्षेप घेतला. कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये योजना चालली आहे कारण आम्ही उद्योगपतींना पैसे देत नाही. जनतेच्या खिशातील पैशांची लुट सुरु आहे. योजना आणल्यापासून खायचे तेलापासून सर्व भाव वाढले. त्याचा परिणाम एक रुपया दिला आणि दहा रुपये काढणार, हे नतभ्रष्ट भाऊ आहेत, हे सख्खे भाऊ नाही, हे वैरी भाऊ आहेत,' असा घणाघातही नाना पटोलेंनी केला.

'राज्य सरकार अकार्यक्षम आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहे, बदलापूर प्रकरणात उच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला ट्रस्टी कुठे गेले आहेत. गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालत असेल त्यामुळे गुन्हेगारांना बळ मिळते. चंद्रपूर युवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी मुलीवर अत्याचार केला तेव्हा त्याला पक्षातून तातडीने काढलं आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले ही आमची परंपरा आहे. भाजप, आरएसएसचे लोक आहेत म्हणून गुन्हेगारांना वाचवण्याचे प्रयत्न केले जातात, म्हणून गुन्हेगारी वाढत आहे, असे म्हणत अत्याचाराच्या घटनांवरुनही पटोलेंनी महायुतीला खडेबोल सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT