Assembly Election Rediff mail
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: अजित पवार महायुती सोडणार? विधानसभा निवडणुकीत ठरणार 'किंग मेकर'

Assembly Election: राज्याच्या राजकारणातील उलथा पालथ सगळ्यांनीच पाहिली. मात्र आता विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या जागा वाटपात सर्वात कमी जागा मिळणारे अजित पवार हे निकालानंतर किंग मेकर असतील, असा दावा मलिकांनी केलाय. मात्र दादा खरंच किंग मेकर ठरणार का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांच्या वाट्याला अवघ्या 52 जागा आल्या आहेत. त्यामुळे निकालानंतर अजित पवारांचं भवितव्य काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय. मात्र नवाब मलिकांनी अजित पवार हे निवडणुकीनंतर सत्तेच्या राजकारणात किंग मेकर ठरणार असल्याचं भाकीत नवाब मलिकांनी केलंय. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडालीय. तर राऊतांनी मात्र ठाकरेच किंग मेकर ठरणार असल्याचा पलटवार केलाय.

अजित पवारांच्या गेल्या पाच वर्षांच्या राजकीय वाटचालीवर एक नजर टाकली तर मलिकांच्या विधानाचा अर्थ लक्षात येईल. महाविकास आघाडीची निर्मिती होत असताना अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी केला. केवळ ८० तासांनंतर अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार पुन्हा ठाकरेंच्या नेतृत्वातल्या मविआ सरकारमध्ये सामील झाले. साडे तीन वर्षांनंतर अजित पवार पुन्हा भाजपसोबत घरोबा करून महायुती सरकारमध्ये सहभागी झाले.

अजित पवारांचा हा राजकीय इतिहास आणि गेल्या पाच वर्षांतल्या युत्या आणि आघाड्यांचं राजकारण पाहिल्यानंतर राजकारणात काहीही होऊ शकतं हे सर्वांनी पाहिलंय. मात्र अजित दादांच्याच पक्षाचे माजी मंत्री असलेल्या मलिकांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं विधान केल्यामुळे अजितदादा पुन्हा भाजपला सोडून मविआत येण्याची हॅटट्रिक करणार का? याचीच चर्चा आतापासून रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT