Ajit Pawar Vs Yugendra Pawar Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Maharashtra Election: बारामतीत पवार काका-पुतण्यातला संघर्ष वेगळ्याच वळणार पोहचलाय.. अजित दादांनी पवारांच्या सांगता सभेचं पारंपरिक मैदान मारलंय..मात्र अजित पवारांच्या सभेनं पुतण्याचा गेम होणार का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

बारामतीच्या काका-पुतण्या या लढतीत अजित पवार बाजी मारणार की युगेंद्र पवार? यापेक्षा बारामतीच्या सांगता सभेची जोरदार चर्चा रंगलीय. कारण अजित पवारांनी बारामतीतील शरद पवारांची पारंपरिक सांगता सभेचं मैदानच हायजॅक केलंय...त्यामुळे सध्या बारामतीच्या लढतीपेक्षा पवारांच्या सांगता सभेचीच जास्त चर्चा रंगलीय. त्यामुळे या सभेतल्या भाषणाकडेच जास्त लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. त्यावेळी बारामतीतील लोकांमध्ये भावनिक लाट पसरली होती. मात्र आता विधानसभेला बारामतीचा प्रचार कोणत्या मुद्द्यांभोवती फिरतोय? पाहूयात..

बारामतीच्या निवडणुकीतील मुद्दे

लोकसभेला ताई तर विधानसभेला दादा अशी अजितदादांची साद

बारामतीत हजारो कोटींचा निधी मंजूर केल्याचा दादांचा दावा

पवारांनंतर बारामतीचा वाली मीच, दादांचं विधान

बारामतीत भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढल्याचा युगेंद्र पवारांचा दावा

विकास, निष्ठा आणि भावनिक मुद्दे महत्वाचे ठरणार

शरद पवार हे 1967 पासून प्रचाराची सांगता सभा ही बारामतीतील मिशन हायस्कूलच्या बंगला मैदानावर घेत होते. मात्र या मैदानाची परवानगी अजित पवारांना मिळाल्याने पवारांना मुलगी सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेप्रमाणेच नातू युगेंद्र पवारांसाठी लेंडीपट्टा मैदानावर सभा घ्यावी लागणार आहे.

आतापर्यंत मिशन बंगला मैदानावरच्या सांगता सभेतला पवारांचा शब्द बारामतीकरांनी पाळलाय. मात्र लोकसभेप्रमाणे बदललेल्या लेंडीपट्टा मैदानावरील सांगता सभेतला पवारांचा शब्द बारामतीकर पाळणार की अजितदादांच्या हाकेला प्रतिसाद देणार याची उत्सुकता केवळ बारामतीकरांनाच नव्हे तर सा-या राज्याला लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT