Pawar Family Diwali Padwa Baramati  Pawar Family Diwali Padwa Baramati
Maharashtra Assembly Elections

Sharad Pawar vs Ajit Pawar : पवारांच्या पाडव्यातही फूट, अजित पवारांचा काटेवाडीत दिवाळी पाडवा!

Pawar Family Diwali Padwa Baramati : बारामतीत यंदा दोन्ही पवारांची पाडवे वेगळे होणार अजित पवार काटेवाडी साजरा करणार पाडवा

Namdeo Kumbhar

Pawar Family Diwali Padwa Baramati : वेगळी राजकीय भूमिका (sharad pawar vs Ajit pawar) घेणारे अजित पवार हे बारामतीमध्ये होणाऱ्या पवार कुटुंबाच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमापासूनही दूर राहणार आहेत. ते काटेवाडी येथील निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा करणार आहेत. बारामती येथील गोविंदबागेत गेली ५० वर्षांपासून दिवाळी पाडवा साजरा होत आहे. अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर यंदाच्या पाडव्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण अजित पवार गोविंदबागेत होणाऱ्या पाडव्याला येणार नाहीत. अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये याबाबत संकेत दिलेत.

बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केले आहे. नेहमीप्रमाणे गोविंद बागेमध्ये शरद पवारांचा पाडवा होत असतो. त्या ठिकाणी राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटत असतात. आणि या पाडव्याला सर्व पवार कुटुंब एकत्र असतं. यंदा मात्र अजित पवार आपला पाडवा स्वतंत्र करणार आहेत.

अजित पवार आपला पाडवा बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील निवासस्थानी साजरा करणार आहेत. त्या ठिकाणी ते राज्य भरातील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. स्वतः अजित पवारांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muhurat Trading 2024: शेअर बाजारावर लक्ष्मी प्रसन्न, मुहूर्त ट्रेडिंगवर सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची घेतली उसळी

FIR Against Arvind Sawant: 'माल' विधान भोवलं, शायना एनसी यांच्या तक्रारीवरून अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Delhi double killing case : काका-पुतण्याला गोळ्या झाडून संपवल्याने खळबळ; दुहेरी हत्याकांडाचं धक्कादायक कारण आलं समोर

PM Modi Rally in Maharashtra : नरेंद्र मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; प्रचाराचा धडाका, कधी आणि कुठे होणार सभा?

Raj Thackeray: म्हणून मला मंत्रिपद मिळालं, राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर रामदास आठवले यांनी दिलं प्रत्युतर

SCROLL FOR NEXT