Ajit Pawar, Chhagan Bhujbal, Praful Patel Saam Tv
Maharashtra Assembly Elections

NCP Dispute : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; विधानसभा निवडणुकीत 'घड्याळ' वापरता येणार, पण एका अटीवर, VIDEO

NCP Party symbol: अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निर्णय दिलाय.

Bharat Jadhav

Ajit Pawar Party Symbol : अजित पवार यांना पक्ष चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. मात्र अजित पवार यांना प्रत्येक ठिकाणी 'हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' असा मजकूर लिहावा लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरण हे फेब्रुवारी २०२४ पासून सुप्रीम कोर्टात प्रबंलित आहे. ज्यावेळेस निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं. त्यावेळी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी नोटिस देण्यात आली, त्यानंतर त्या नोटिसला अजित पवार गटाने उत्तर देखील दिलं. तो मुख्य विषय अद्याप कोर्टात प्रबंलबित आहे. लोकांमध्ये चिन्हाबाबत संभ्रम आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सुद्धा दुसरं चिन्ह देण्यात यावे. तसेच अर्ज शरद पवार गटाने मागील महिन्यात केला होता.

ज्यावेळी अजित पवार प्रचारात किंवा कोणत्या कार्यक्रमात बॅनर लावतील तेथे घड्याळ चिन्ह वापरत असतील तर त्यावेळी तेथे एक मजकूर लिहिला गेला पाहिजे. ऑडिओ-व्हिडिओ जाहिरात किंवा पत्रकातदेखील हा मजकूर लिहिला गेला पाहिजे. पक्ष आणि चिन्ह प्रकरण हे कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येऊपर्यंतच घड्याळ हे चिन्ह आमच्याकडे आहे. त्यावरून शरद पवार यांचे वकील सांघवी म्हणाले की, अजित पवार गटाकडून हा मजकूर फॉलो केला जात नाहीये.

सिंघवी यांनी दाखवलं की, अजित पवार यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आहे तेथे मजकूर वापरला गेला नाहीये. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात नेण्यात आलंय तेव्हा त्यांनी तो मजकूर लावला. मार्चमध्ये आलेल्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, अजित पवार यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी घड्याळ हे चिन्ह असेल. आणि शरद पवार यांच्याकडे तुतारी चिन्ह असेल. सुप्रीम कोर्टचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हे चिन्ह असणार आहे.

दरम्यान कोर्टाने सांगितलं की, आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यामुळे चिन्ह बदलाविषयी सुचना देता येणार नाहीये. परंतु ६ नोव्हेंबरला हे प्रकरण पुन्हा एकदा ऐकलं जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मावळ मध्ये 17 लाख 75 हजार रोकड जप्त

Mahayuti Meeting Inside Story : भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीत वादग्रस्त मतदारसंघावर तोडगा; अमित शहा यांच्या निवासस्थानी नेमकं काय ठरलं?

Sharad Pawar Group 1st List: काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश, आता थेट उमेदवारी; या ४ दिग्गजांना शरद पवार गटाने दिलं तिकीट; कोणाशी होणार लढत? वाचा...

Diwali Vacation Place : मुंबईतील 'या' ठिकाणी प्लान करा दिवाळी सुट्टीचा बेत, मुलं होतील एकदम खूश

IND Vs NZ 2nd Test: चेंडू समजण्याआधीच उडाला 'हिटमॅन'चा त्रिफळा; रोहित शर्मा चौथ्यांदा बनला साउदीचा शिकार

SCROLL FOR NEXT