Maharashtra Lok Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुती की मविआ? लोकसभेत कोण मारणार बाजी? योगेंद्र यादवांची काय आहे भविष्यवाणी?

Maharashtra Lok Sabha: जनतेला देशाच्या निकालाएवढीच उत्सुकता महाराष्ट्राच्या लोकसभा निकालांची लागलीय. यावेळी मोदी सरकारविरोधात प्रबळ मुद्दा नाही आणि मोदींची लाटही नाही. त्यामुळे निकालांचं आकलन करणं अवघड झालंय.

साम टिव्ही ब्युरो

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं चारशे पारचा नारा दिला असला तरी 2019 सारखी राजकीय परिस्थिती नसल्याचं विश्लेषकांचं म्हणणंय. त्यात काँग्रेसला मोदींना रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये विरोधकांना एकत्र आणण्यात यश आलंय. या निवडणुकीत सत्ताधा-यांविरोधात प्रबळ मुद्दा दिसला नाही तशी मोदींची लाटही दिसली नाही.

त्यामुळे मोदी गेल्यावेळसारखं क्लिन स्वीप करतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकीय परिस्थिती बदलत गेली आहे. त्यामुळे निकालांबाबत आकलन करणं तेवढं सोप राहिलेलं नाही. देशाच्या राजकीय चित्राबाबत जशी उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता महाराष्ट्राबाबत निर्माण झालीय. निवडणूकशास्त्राचे अभ्यासक योगेंद्र यादवांनी महाराष्ट्रातील लोकसभेबाबत भविष्यवाणी केलीय.

महाराष्ट्रात महायुतीला 5 ते 15 जागांचं नुकसान होऊ शकतं 2019 मध्ये महायुतीला 48 पैकी 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी हा आकडा 25 ते 27 पर्यंत खाली येऊ शकतो. महाराष्ट्रात लोकसभेत मविआला 20 ते 22 जागा मिळू शकतात असं अंदाज योगेंद्र यादवांनी वर्तवलाय.

देशातल्या सर्वेक्षण करणाऱ्या अनेक संस्थांनी विविध अंदाज व्यक्त केले आहेत. तसंच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विश्लेषकांनीही भाकितं वर्तवलीयत. मात्र यंदा सर्वांच्या आकलनात मोठी तफावत असल्यामुळे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या चित्राबाबत अधिक उत्सुकता ताणली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News : सोलापूरमध्ये धक्कादायक घटना! विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा, शाखा अध्यक्षांची घेणार बैठक

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT