Aditya Thackeray News Saamtv
लोकसभा २०२४

Aditya Thackeray News: ईडी, सीबीआय, आयटी, भाजपचे मित्रपक्ष.. आदित्य ठाकरेंचा घणाघात

Yavatmal Washim Loksabha Constituency News: महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिमचे उमेदवार संजय देशमुख यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Gangappa Pujari

संजय राठोड, यवतमाळ|ता. २ एप्रिल २०२४

Aditya Thackeray Speech:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिमचे उमेदवार संजय देशमुख यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. संजय देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यवतमाळमध्ये दाखल झाले होते. यावेळी यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडमध्ये आदित्य ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"देशात वातावरण बदलत आहे. परिवर्तनाचे वारे वाहायला लागलेले आहेत आणि मलाही खात्री पटलेली आहे. गेले दोन अडीच वर्ष जे काही मी महाराष्ट्रात पाहत आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहत आहे. जो बदल घडणार आहे तो बदल घडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य जे असेल तो आपला महाराष्ट्र असेल आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र कधी अन्याय सहन करत नाही," असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

"भाजपच्या विरोधात लढाई लढत आहोत. भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत म्हणूनदोन मुख्यमंत्र्यांना अटक केली. भाजपने आपल्या देशाची बदनामी जगभरात झालेली आहे. ईडी, सीबीआय भाजपचे मित्रपक्ष झालेत," अशी टीका करत यवतमाळ वाशिम आपण जिंकणारचं, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

रोहित पवारांचे टीकास्त्र..

"महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) मशाल चिन्हावर संजयजी देशमुखचे उभे आहेत. त्यांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभे राहायचं आहे. संजयजी राठोड साहेबांना कदाचित तिथे तिकीट मिळू शकत भावनिक राजकारण चालणार नाही. समजा चुकून जर संजय राठोड यांना तिकीट मिळाली तर चित्र वाघ यांना बोलणार," असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT