Prashant Kishor Saam Tv
लोकसभा २०२४

Prashant Kishor: भाजप 400 पार करणार की नाही? राज्यात महायुती की मविआ? प्रशांत किशोरांची राजकीय भविष्यवाणी

Lok Sabha Election 2024: राजकारणात काय घडणार याच्या गप्पा गावच्या पारावर, धावत्या लोकल ट्रेनमध्ये ते अगदी चहाच्या टपरीवर रंगतात..आपल्या देशात तर प्रत्येकजण राजकीय विश्लेषक असतात असं असलं तरी प्रशांत किशोर यांच्या राजकीय भाकितांना एक वेगळं महत्त्व आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही भाकीतं वर्तवलीयेत. किशोर यांनी गेल्या अनेक निवडणुकांबाबत अंदाज वर्तवले आहेत आणि ते बहुतांशी खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या या भाकिताबाबतही मोठी चर्चा रंगलीय.

पीकेंची भविष्यवाणी

“लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. पण प्रत्यक्षात भाजपाला 300 जागा मिळतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राग नाही. मात्र भाजपाला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे. त्यांना जवळपास 300 जागा मिळतील मात्र 270 च्या खाली सुद्धा जाणार नाहीत”, असं भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तवलंय.

प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा, लोकसभेला राजकीय व्युहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या निकालांबाबतही अंदाज व्यक्त केले आहेत. राज्यातील स्थितीबाबत किशोर यांनी काय भाकित केलंय जाणून घेऊ...

'महाराष्ट्रात जागा कमी, तरी सत्तेची हमी'

महाराष्ट्रात 20 ते 25 जागा जिंकू असा विश्वास मविआला आहे. मविआनं 25 जागा जिंकल्या तरी भाजपचं काहीही नुकसान होणार नसल्याचं किशोर यांचं म्हणणंय. सध्या महाराष्ट्रात 48 पैकी केवळ 23 जागा भाजपकडे आहेत. अशा स्थितीत विरोध वाढूनही भाजपचे नुकसान नाही', असंही ते म्हणाले.

देशातील लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात पोहचल्या आहेत..भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येतायत. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेली राजकीय भविष्यवाणी कितपत खरी ठरते याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Rajyog: 7 दिवसांनंतर मंगळ बनवणार ‘रूचक महापुरुष राजयोग’, गाडी, बंगला, पैसा सर्वकाही मिळणार

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT