Satara Lok Sabha Constituency Saam Tv
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha: उदयनराजे दिल्लीत, मात्र अमित शाह यांची भेट झालीच नाही; साताऱ्यात भाजप कोणाला देणार उमेदवारी?

Lok Sabha Election 2024: सातारा लोकसभा मतदारसंघातून अजूनही खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. उदयनराजे हे सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> ओंकार कदम, सातारा

Satara Lok Sabha Constituency

सातारा लोकसभा मतदारसंघातून अजूनही खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. उदयनराजे हे सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र अजून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झालेली नाही. याबाबत त्यांचे निकटवर्तीय व सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, ''आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या 20 मतदार संघाची यादी जाहीर झालेली आहे. अजून 28 ठिकाणची मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर करणे बाकी आहे. त्यामुळे उरलेल्या 28 जागा या पुढील एक-दोन दिवसांमध्ये जाहीर होतील. त्यामुळे याविषयी थोडं थांबणं उचित होईल.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुनील काटकर म्हणाले, ''उमेदवारी जाहीर होईपर्यंत वेगवगेळ्या गोष्टी घडणार आहेत. अजून वेगवेगळ्या पद्धतीचे अंदाज बांधले जाणार आहेत. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असताना अवघ्या सहा महिन्यात राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे हजार उदयनराजे हे कमळाच्या चिन्हावरच लढतील. याआधी सुद्धा भाजपचा जिल्हा कार्यकारिणीने उदयनराजे यांना छुपा विरोध केला होता. अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. मात्र अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नाही. उलट उदयनराजेंची एकमताने सगळ्यांनी शिफारस केली आहे.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, आमदार असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील अन्य पदाधिकारी असतील या सर्वांच्या विचाराने भारतीय जनता पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली पाहिजे, अशीच इच्छा व्यक्त केली होती. दोन दिवसात ती जाहीर होईल. उदयनराजे यांना अमित शाह यांची भेट मिळत नाही, या सर्व अफवा आहेत. आता आम्हाला मुंबईत ज्यांना भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलेलो आहे.

काटकर म्हणाले, ''मुंबईमध्ये उदयनराजेंना एखाद्याला भेटायचं असेल तर त्यांची वेळ मागून जावं लागत नाही. त्यांना कोणत्या वेळेची मर्यादा नसते. योग्य वेळी योग्य सर्व भेटी होतील. थोडं वाट बघणं उचित ठरेल. या सर्व गोष्टींना उद्या दुपारपर्यंत पूर्णविराम मिळेल. छत्रपतींचा गनिमी कावा सर्वांना माहित आहे. त्यांनी कधीही कोणाशी दगाफटका केला नाही. त्यामुळे त्यांनाही कधी दगा फटका होणार नाही, एवढा आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT