Pune Loksabha Election 
लोकसभा २०२४

Pune Loksabha Election: 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'? वसंत तात्या कुणाचं गणित बिघडवणार?

Pune Loksabha Election: पुणे लोकसभा मतदारसंघाचं चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं. पुण्यात 50.32 टक्के मतदान झालं. आता पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू

पुणे : पुण्यात लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. कसबा पेठ आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून कुणाला किती मताधिक्य मिळणार यावर विजयाची समीकरणं ठरणार आहेत. त्यामुळे कसबा पेठेतला धंगेकर पॅटर्न पुणे लोकसभेत कायम राहणार की मोहोळांना कोथरूड साथ देणार यावरचा विशेष रिपोर्ट.

पुणे लोकसभा मतदारसंघाचं चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं. पुण्यात 50.32 टक्के मतदान झालं. म्हणजे गेल्यावेळच्या तुलनेत मतदान एक ते दीड टक्याने वाढलं. त्यामुळे या तिरंगी लढतीतल्या उमेदवारांची धाकधूक आणखीनच वाढली. वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याचीच आता चर्चा पुण्यात रंगलीय. इथे खरी लढत मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीच्या मुरलीधर मोहोळ यांच्यात आहे. मात्र वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी मिळाली आणि पुण्यातली लढत तिरंगी झाली. या निवडणुकीत मराठा, मुस्लीम आणि बहुजन मतांचं झालेलं विभाजनावर विजयाचं गणित ठरणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं. रवींद्र धंगेकर हे कसब्याचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांना या मतदानाचा फायदा होणार का ? तर दुसरीकडे कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवलं. मात्र तरीही कोथरूडमध्ये गेल्यावेळच्या तुलनेत एक टक्का मतदान कमी झालंय. त्यात कोथरूड हे मुरलीधर मोहोळांचे होम पीच आहे. त्यामुळे कमी झालेलं मतदान मोहोळांना फायद्याचं की तोट्याचं याची उत्सुकता वाढलीय.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपनं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवलं खरं. मात्र याचा मोहोळांना किती फायदा होणार आणि वंचितचे वसंत मोरे विजयापासून कुणाला वंचित ठेवणार यावर कोण संसदेत जाणार हे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT