Sixth Phase Voting Saam Tv
लोकसभा २०२४

Sixth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान, कोणाचे भवितव्य लागले आहे पणाला?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी 25 मे रोजी 8 राज्यांतील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व सात जागांसह सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. दिल्लीसोबतच, उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील सर्व 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशातील 6 , झारखंडमधील 4 आणि जम्मू-काश्मीरमधील 1 जागेवर मतदान होणार आहे.

याशिवाय ओडिशाच्या 42 विधानसभा जागांवरही मतदान होणार आहे. या टप्प्यात 11.13 कोटीहून अधिक लोक मतदानासाठी पात्र आहेत. यामध्ये 5.84 कोटी पुरुष, 5.29 कोटी महिला आणि 5,120 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी जागेवरही मतदान होणार आहे.

सहाव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी (भाजप) आणि कन्हैया कुमार (काँग्रेस), सुलतानपूर (उत्तर प्रदेश) मनेका गांधी (भाजप), तमलूक (पश्चिम बंगाल) मधून अभिजित गंगोपाध्याय (भाजप), कर्नालमधून माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कुरुक्षेत्रमधून नवीन जिंदाल आणि गुरुग्राममधून राव इंद्रजीत सिंग आहे. मतदारांनी निवडणूक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन जबाबदारीने व अभिमानाने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

सहाव्या टप्प्यात बिहारमधील आठ जागांवर मतदान होणार असून, या भागातील सुमारे 1.5 कोटी मतदार 86 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील. राज्यातील या आठ जागांवर निष्पक्ष आणि शांततेत मतदान व्हावे यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या टप्प्यात ज्या आठ जागांवर मतदान होणार आहे, त्यात वाल्मिकीनगर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, श्योहर, वैशाली, गोपालगंज, सिवान आणि महाराजगंज यांचा समावेश आहे.

ओडिशातील या टप्प्यात, भुवनेश्वर, कटक, ढेंकनाल, क्योंझर, पुरी आणि संबलपूर या सहा लोकसभा मतदारसंघ आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 42 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : गणरायांची कृपा होणार; अचानक धनलाभाचा योग; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Dry Skin Care: बदलत्या वातावरणामुळे चेहरा ड्राय आणि डल पडला आहे? मग रोज करा हा साधा घरगुती उपाय

RBI चा मोठा निर्णय! कार, स्मार्टवॉच अन् टीव्हीद्वारे करता येणार UPI पेमेंट

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT