Ravindra Dhangekar Saam TV
लोकसभा २०२४

Pune News: भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग, आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. १९ मार्च २०२४

Pune Loksabha Election 2024:

चार दिवसांपूर्वी देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे निवडणुकीच्या घोषणेसोबत आचारसंहिता लागली असतानाच पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात भाजपकडून (BJP) आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रसने केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर तसेच मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये भाजपकडून जाणून बुजून शहरभर कमळ या चिन्हाचा वॉल पेंटिंग करत असल्याचे कलेक्टर यांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच या संदर्भात जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार असा इशाराही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये प्रचाराआधीच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे जगदीश मुळीक नाराज?

पुण्यात महायुतीची समन्वय बैठक आज पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघ निहाय बैठक झाली. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह इतर मित्र पक्षातील मुख्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मात्र या बैठकीला भाजप नेते जगदीश मुळीक उपस्थितीत नव्हते, त्यामुळे जगदीश मुळीक पक्षावर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT